गणेशासाठी खास पदार्थ; पाकाचा वापर न करता बनवा लुसलुशीत 'रव्याचे मोदक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rava modak recipe

गणेशासाठी खास पदार्थ; पाकाचा वापर न करता बनवा लुसलुशीत 'रव्याचे मोदक'

गणरायाचे आगमण चार दिवसांवर आले आहे. त्यामुळे स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. अगदी घरापासून ते सार्वजनिक गणपती स्थापनेच्या डेकोरेशनसाठी सर्वांची गडबड सुरु आहे. गणरायाच्या प्रसादासाठी कोणते पदार्थ तयार करावे या कामात गृहीणी व्यस्त आहेत. प्रसादासाठी रोज एका गोड पदार्थाची यादी बनवण्याची घाई गडबड सगळीकडे दिसत आहे. (rava modak recipe)

या गोड पदार्थांमध्ये तुम्ही रव्यापासून तयार केलेल्या मोदकांचा समावेश करु शकता. बनवायला अगदी सोपा आणि घरीच उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून हा पदार्थ तयार होता. बऱ्याचवेळा रव्याचे लाडू किंवा मोदक बनवताना साखरेचा पाक फसला तर पदार्थ बिघडतो. त्यामुळे पाकातले मोदक बनवायचे म्हणजे थोडा विचार करावा लागतो. अनेकवेळा महिला एकमेकींच्या सल्ल्याने हा पाक बनवतात. परंतु एकदा का तो बिघडला की मग मात्र नाकीनऊ येतात. (रवा मोदक रेसिपी)

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणरायाच्या आरासेसाठी काही खास आयडिया; देवघराची वाढेल शोभा

रव्याचे लाडू दिवाळीमध्ये आवर्जून बनवले जातात. तेव्हा बऱ्याचवेळी हा पाक बिघडतो किंवा फसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाणी, दूध किंवा पाक या कोणत्याच गोष्टीचा वापर न करता झटपट मऊ लुसलुशीत रव्याचे मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे. ही रेसिपी फॉलो केल्यावर तुमचे मोदक आणि लाडू परफेक्ट बनतील यात काही शंकाच नाही. चला तर मग तयार करु रुचकर रव्याचे मोदक.. (rava modak recipe kase karave)

साहित्य -

 • ५०० ग्रॅम बारीक रवा

 • ३०० ग्रॅम पिठीसाखर

 • वेलची जायफळ पावडर

 • सुका मेवा ( बदाम, काजू, पिस्ता, किसमिस )

 • तूप / डालडा

कृती -

 • गॅस चालू करा आणि कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तूप किंवा डालडा घाला.

 • तूप किंवा डालडा गरम झाल्यावर त्यात सुका मेवा भाजून घ्या. यानंत त्यातच बारीक रवा घाला आणि ४-५ मिनिटे सतत परतत घेत रवा चांगला भाजून घ्या. (गॅस बारीक ठेवून रवा .भाजा त्यामुळे रव्याचा कलर बदलणार नाही आणि रवा सुध्या चांगला भाजला जाईल.)

 • रवा चांगला भाजून झाल्यानंतर त्यात वेलची जायफळ पावडर घाला. त्याचबरोबर पिठीसाखर घाला आणि २-३ मिनिटे मिश्रण एकजीव करून घ्या.

 • मिश्रण एकजीव झाल्यावर परात किंवा बाउलमध्ये काढून घ्या.

 • मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात डालडा किंवा तूप गरम करून थोडे थोडे ओता. आता मोदकाच्या आकाराचा तयार असलेला छोटा साचा घ्या आणि त्यात हे मिश्रण दाबून भरा.

 • यानंतर ते मोदकाचा आकार येईपर्यंत दाबून बसवा आणि नंतर काढून घ्या. मस्त आकाराचे गोड मोदक तयार आहेत. अश्याच प्रकारे सगळे मोदक बनवून घ्या. हवे असल्या तुम्ही हे मिश्रण गरम करु शकता म्हणजे थंड झाल्यावर त्याचा आकार मोडणार नाही.

 • गणपतीच्या नैवेद्यासाठी झटपट असे कमी वेळात मऊ लुसलुशीत, जास्त दिवस टिकणारे रव्याचे मोदक तयार आहेत.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : बाप्पाला आवडणारी गोड अननस-नारळ बर्फी कशी बनवावी पाहा; ट्राय करा

Web Title: Ganeshotsav 2022 How To Make Rava Modak Recipe In Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..