Ganeshotsav 2022 : गौराईच्या नैवेद्याला करा 'हे' हटके खीरीचे प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : गौराईच्या नैवेद्याला करा 'हे' हटके खीरीचे प्रकार

बुधवारी घरोघरी थाटामाटात बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यानंतर काल गणेशाची माता गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.गौराईंचे आगमन आणि त्यांचे कौतुक करण्यात महिला वर्ग व्यस्त आहे. गौराईला पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा तर दुसऱ्या दिवशी गोडा-धोडाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पुरणपोळीच्या नैवेद्यासोबतच हे काही हटके खीरीचे प्रकार नक्की ट्राय करा...

 • बदाम खीर

साहित्य:

साल काढलेली बदामाची पूड

खवा

फुल क्रिम दुध

साखर आणि वेलची पूड

 • कृती:

 • बदामाची साल काढून पूड करा.

 • बदाम भिजवल्यास साल पटकन निघतात.

 • काढून त्याची पेस्ट करुन घ्या.

 • पातेल्यात दूध गरम करुन त्यात खवा आणि साखर घाला.

 • एक उकळी काढून त्यामध्ये बदामाची पूड घाला.

 • ती चांगली जाड होईल.त्यावर शेवटी वेलची पूड घाला.

 • थंड करुन खाल्ल्यास या खीरीची चव अधिक वाढेल.

हेही वाचा: Food Recipe : सूजीऐवजी ट्राय करा हरभरा डाळीचा हलवा; पहा सोपी रेसिपी

 • दुधीची खीर

साहित्य:

एक वाटी किसलेला दुधी

दूध

ड्रायफ्रुट्सचे काप

वेलची पूड

तूप आणि खवा

 • कृती:

 • दूधी किसून घेऊन त्याचे पाणी काढून टाका.

 • पॅनमध्ये तूप गरम करुन त्यामध्ये किसलेला दुधी घाला

 • त्यानंतर खवा घालून परता.

 • त्यामध्ये उकळलेले दूध, साखर घाला.

 • सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून ही दुधीची खीर मस्त सर्व्ह करा.

 • साऊथ इंडियन पायसम

पायसम हा साऊथ इंडियन खीरीचा प्रकार आहे. पायसम खीर ही मध्यम प्रकारात येते. फार जड किंवा फार पातळ नसते.

साहित्य:

फुल फॅट दुध

साखर किंवा गुळ

ड्रायफ्रुट्स

भाजलेल्या शेवया

केशराच्या काड्या

वेलची पूड

 • कृती:

 • दूध गरम करून घ्या.

 • त्यामध्ये भाजलेल्या शेवया घाला.

 • शेवया चांगल्या शिजल्या कि त्यामध्य ड्रायफ्रुट्स घाला.

 • वेलची पूड आणि केशराच्या काड्या घालून खीर सर्व्ह करा.

हेही वाचा: Recipe : झटपट बनणारा दूधी हलवा; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

Web Title: Ganeshotsav 2022 Three Different Kheer For Gouri Ganpati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..