
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर भक्तीमय वातावरणात गुलकंद मोदक बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. तूप, दूध पावडर, रोझ सिरप आणि गुलकंद वापरून हे मोदक तयार करता येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे मोदक बाप्पाला अर्पण करून प्रसन्नता मिळवा.
Gulkand Modak Recipe: घराघरात बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तीमय आणि आनंदी वातावरण झाले आहे. सकाळ-संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती केली जात आहे. लंबोदराला मोदक, लाल फुल आणि दुर्वा खुप प्रिय आहे. या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात. बाप्पाला रोज वेगवेगळ्या चवीचे स्वादिष्ट मोदक अर्पण करू शकता. आज बाप्पासाठी गुलकंद मोदक तयार करू शकता. हे मोदक बनवणे खुप सोपे आहे. गुलकंद मोदक कमी वेळेत हे मोदक तयार होतात. घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हे मोदक आवडेल. हे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.