कोल्हापुरात 21 फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी पोलीस कार्यकर्त्यांत बाचाबाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी झालेली गर्दी

21 फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी पोलीस कार्यकर्त्यांत बाचाबाची

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी गणेश मूर्ती विसर्जनावेळी वाद झाला. मूर्तीची उंची आणि कार्यकर्त्यांची संख्या यामुळे पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हटकले. त्यातून वाद निर्माण झाला.

या मंडळाची २१ फुटी गणेश मूर्ती बसवण्याची परंपरा आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक मंडळांनी चार फूट उंची पेक्षा कमी मूर्तीची प्रतिष्ठापना करणे बंधनकारक आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाने परंपरेप्रमाणे २१ फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ही मूर्ती बापट कॅम्प येथे तयार करण्यात आली.

गणेशचतुर्थी दिवशी पालखीतून उत्सव मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणली. यावेळी पारंपरिक वाद्य वाजवण्यात आली. त्यामुळे नियमाचे उल्लंघन केल्यामुळे मंडळावर पूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच कार्यकर्ते चौकांमध्ये जमा झाले. मंडपातून मूर्ती बाहेर आणली गेली. मूर्ती विसर्जन मार्गावर नेत असताना पोलीस आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

कार्यकर्त्यांच्या संख्येवरून पोलिसांनी त्यांना हटकले. विसर्जन मार्गावरील तांबट कमानी जवळही कार्यकर्ते आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर मूर्तीचे इराणी खणीत विसर्जन करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह चार पोलीस निरीक्षक यांच्या बंदोबस्तात २१ फूट गणेश मूर्तीचे विसर्जन झाले.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Tarun Mandal Kolhapur 21 Feet Ganesh Idol Visiarjan 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
go to top