सोळावं वरीस 'ग्रेटा'चं; ठरली 'पर्सन ऑफ द इअर'!

वृत्तसंस्था
Thursday, 12 December 2019

चालू वर्षाच्या सुरवातीला ग्रेटाची शिफारस शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी करण्यात आली होती.

न्यूयॉर्क : 'टाइम मासिका'च्या 'पर्सन ऑफ द इअर'चा बहुमान यंदा हवामान बदलांच्या विरोधात काम करणाऱ्या स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग हिला मिळाला आहे. ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षांची असून, हा बहुमान मिळालेली ती आजवरची सर्वांत तरुण व्यक्ती ठरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

शालेय विद्यार्थिनी असलेल्या ग्रेटाने हवामान बदलांच्या विरोधात जागृतीसाठी मोहीम सुरू केली असून, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे. 

- 26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईद 'टेरर फायनान्सिंग'मध्ये ठरला दोषी!

टाइम मासिकाकडून पर्सन ऑफ द इअर म्हणून ग्रेटाच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. ग्रेटाने आजच माद्रिदमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) आयोजित केलेल्या हवामानबदल परिषदेत जागतिक प्रतिनिधींसमोर भाषण केले. पुढील दशक पृथ्वीचे भविष्य निश्‍चित करणारे असेल याची आठवण ग्रेटाने आपल्या भाषणातून जागतिक नेत्यांना या वेळी करून दिली. 

- जगातील सर्वात तरुण पंतप्रधान पाहिल्या का?

ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. त्यानंतर ग्रेटाच्या मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्वरूप आले. त्या वेळी #फ्रायडेफॉरफ्युचर असा हॅशटॅग वापरून जगभरातील लहान-थोरांनी ग्रेटाला आपला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर हवामानबदलांबाबत जागतिक पातळीवरील आवाज म्हणून ग्रेटाकडे पाहिले जाऊ लागले. ग्रेटाच्या मोहिमेत जगभरातील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. 

- बघा, कोण ठरली यंदाची मिस युनिव्हर्स?

चालू वर्षाच्या सुरवातीला ग्रेटाची शिफारस शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी करण्यात आली होती. जगप्रसिद्ध टाइम मासिकाद्वारे 1927 पासून पर्सन ऑफ द इअर निवडण्यात येतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 year old Greta Thunberg is named Time Person of the Year for 2019