Crime News: धक्कादायक! लंडनमध्ये आणखी एका भारतीयाची चाकूने भोसकून हत्या, तीन दिवसांत दुसरी घटना

ब्रिटनमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन भारतीय नागरिकांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
Crime News Indian-Origin Man Stabbed In London
Crime News Indian-Origin Man Stabbed In London
Updated on

Indian-Origin Man Stabbed In London: ब्रिटनमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन भारतीय नागरिकांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या ताज्या हल्ल्यात अरविंद शशिकुमार (३८) या भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

तर या घटनेच्या अवघ्या तीन दिवस आधी लंडनमध्ये शिकणाऱ्या हैदराबाद येथील २७ वर्षीय विद्यार्थिनीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली होती. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद शशिकुमार असे मृताचे नाव आहे. जो मूळचा केरळचा होता. शुक्रवारी त्याचा रूममेट सलमान सलीम याने त्याच्या छातीवर वार करून त्याची हत्या केली.

विद्यार्थी व्हिसावर आल्यानंतर शशीकुमार गेल्या १० वर्षांपासून यूकेमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय सलमान सलीमला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

हे दोघे साउथेम्प्टन वे, कॅम्बरवेल येथे एका घरात एकत्र राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर प्रकरण चिघळले आणि भांडण झाले.

त्यानंतर आरोपींनी अरविंद शशीकुमार याची चाकूने वार करून हत्या केली. ही घटना १६ जून रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तर शुक्रवारी रात्री १.३१ वाजता अरविंद शशीकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार शशिकुमारचा मृत्यू छातीत वार झाल्यामुळे झाला.

Crime News Indian-Origin Man Stabbed In London
PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार अंतराळ संबंधांवर चर्चा; गगनयान मोहिमेसाठी नासा करू शकतं मदत

पोलिसांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, गुन्हे शाखेच्या तज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे याच्या काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधून ‘मास्टर ऑफ सायन्स (एमएससी)’चे शिक्षण घेत असलेल्या हैदराबादच्या तेजस्विनी कोनथम (२७) हिची राहत्या घरी वार करून हत्या करण्यात आली होती.

Crime News Indian-Origin Man Stabbed In London
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.