वधूने पार्टीत वाजवले उत्तेजक गाणे! लग्न होताच वराने दिला घटस्फोट | Global | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वधूने पार्टीत वाजवले उत्तेजक गाणे! लग्न होताच वराने दिला घटस्फोट
वधूने पार्टीत वाजवले उत्तेजक गाणे! लग्न होताच वराने दिला घटस्फोट

वधूने पार्टीत वाजवले उत्तेजक गाणे! लग्न होताच वराने दिला घटस्फोट

केवळ भारतच (India) नाही तर जगातील अनेक देशांतून लग्नाच्या अनेक आश्‍चर्यकारक घटना समोर येत असतात आणि अलीकडे सोशल मीडियावर (Social Media) त्या व्हायरल होतात. कधी कधी ही प्रकरणे गमतीशीर असतात, नंतर अनेक गंभीर घटनाही समोर येतात. बगदादमधून (Baghdad) असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे लग्नाच्या वेळी वराने वधूला घटस्फोट दिला. वधूचा दोष एवढाच होता की तिने लग्नानंतरच्या पार्टीत एक गाणे वाजवले आणि वराला ते गाणे आवडले नाही. (A funny story about a wedding in Baghdad is going viral on social media)

हेही वाचा: बूस्टर डोससाठी 'असा' मेसेज-कॉल आल्यास सावधान! बॅंक खाते होईल रिकामे

वास्तविक ही घटना इराकमधील (Iraq) बगदादमधील आहे. 'गल्फ न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, येथे एक विवाह सोहळा (Marriage) पार पडला. यावेळी वधू-वरांचे अनेक नातेवाईक तेथे उपस्थित होते. दरम्यान, नववधू डीजे वाजत असलेल्या ठिकाणी पोहोचली आणि गाणे वाजवले. रिपोर्टनुसार, नववधूने एक सीरियन गाणे (Syrian Song) वाजवले जे खूपच उत्तेजक असल्याचे सांगण्यात आले.

हे गाणे ऐकताच तेथे उपस्थित असलेले लोक अवाक्‌ झाले. वरालाही हे सीरियन गाणे आवडले नाही. हद्द तेव्हा झाली जेव्हा वराला दिसले की वधूही या गाण्यावर नाचत आहे. सुरुवातीला तेथे उपस्थित काही लोकांनी वधूला थांबवले, मात्र त्यानंतर वराचा वधूसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की, वराने तिथेच वधूला घटस्फोट (Divorce) दिला.

हेही वाचा: 'या' शेअर्सनी दिला जबरदस्त 22000 टक्‍क्‍यांपर्यंत परतावा!

या गाण्याचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. ते 'मेसायतारा' नावाचे सीरियन गाणे असल्याचे सांगण्यात आले. या गाण्याचा अर्थ 'आय एम डोमिनेंट' किंवा 'आय विल कंट्रोल यू' असा आहे. या गाण्यामुळे वराला इतका जबर धक्का बसला की, त्याने लग्नाच्या मंडपातच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सध्या हा घटस्फोट चर्चेचा विषय बनला आहे. याला 2022 या नवीन वर्षातील सर्वात जलद घटस्फोटही म्हटले जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top