तरुणाचे प्रपोज करण्याचे स्वप्न भंगले, दोघात आला तिसरा, पहा Video

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायल होत असून नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले.
viral video
viral videosakal

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील लग्नासाठी प्रपोज करण्याचा क्षण अविस्मरणीय असतो. मात्र एका व्यक्तीच्या या क्षणावार एकाने विर्जन टाकले आहे. एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज करत होता मात्र तितक्यात असे काही झाले की त्याचा हा क्षण सेकंदातच उद्ध्वस्त झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायल होत असून नेटकरी व्हिडीओ पाहून संतापले आहे. हा व्हिडीओ पॅरिसमधील Disneyland येथील आहे.

viral video
अरब देशातील कचराकुंडीवर मोदींचा फोटो, राजकारण तापलं

या व्हिडिओमध्ये एक तरुण गुडघे टेकून आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करत होता. पण तितक्यात तेथील एका कर्मचाऱ्याने मध्येच येत या तरुणाच्या हातातील अंगठी हिसकावून घेतली. डिस्नेलँडच्या या कर्मचाऱ्याने आधी अंगठी हिसकावून घेतली नंतर पायऱ्यांवरुन त्यांना खाली उतरवले. याठिकाणी प्रपोज करू शकत नाही, असे कर्मचाऱ्याने सांगितले.

viral video
वादग्रस्त वक्तव्यानंतर संतापलेल्या कतारला भारताने दिले उत्तर; म्हणाले...

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या कर्मचाऱ्यावर टीका करीत आहे. कर्मचाऱ्याचे वागणूक चुकूची होती असे नेटकरी म्हणताहेत. वाद वाढल्याने Disneyland पॅरिसच्या वतीने या प्रकरणावर माफी मागितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com