Nobel Prize 2019 : भारतीय वंशाच्या अर्थतज्ज्ञाला अर्थशास्त्राचे 'नोबेल' जाहीर!

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

बॅनर्जी, डफलो आणि क्रेमर या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे जगातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठीच्या संघर्षात मदत झाली आहे.

स्टॉकहोम : यंदाचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी, इस्टर डफलो आणि मायकल क्रेमर या तिघांना विभागून दिला जाणार आहे. जगातून दारिद्रयाचे निर्मूलन व्हावे म्हणून काम केल्याबद्दल बॅनर्जी यांच्यासह इतर दोघांना 2019 साठीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे, असे नोबेल समितीने म्हटले आहे. 

बॅनर्जी, डफलो आणि क्रेमर या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे जगातून गरिबीचे उच्चाटन करण्यासाठीच्या संघर्षात मदत झाली आहे. या तिन्ही अर्थतज्ज्ञांच्या नव प्रयोगात्मक दृष्टिकोनामुळे अवघ्या दोन दशकांमध्ये विकासात्मक अर्थशास्त्राचा चेहरा मोहरा बदलून गेला असून, त्यामुळे या क्षेत्रातील संशोधनाला वेग आला आहे, असे नोबेल समितीने निवेदनात नमूद केले आहे. 

कोण आहेत अभिजीत बॅनर्जी?

अभिजीत बॅनर्जी (वय 58) यांनी भारतातील कोलकता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) या दोन विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी 1988 ला हॉर्वर्ड विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली आहे. 

बॅनर्जी सध्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये फोर्ड फाउंडेशन आंतरराष्ट्रीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डफलो आणि सेंधील मुल्लैनाथन यांच्यासाथीने बॅनर्जी यांनी 2003 मध्ये अब्दूल लतीफ जमील पॉव्हर्टी ऍक्‍शन लॅबची (जे-पीएएल) स्थापना केली आहे. ते सुरवातीपासून 'जे-पीएएल'चे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- सौरव गांगलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती; जय शहा सचिव

- मुंबईतील पेनिन्सुला बिझनेस पार्कमध्ये आग

- Vidhan Sabha 2019 : निवडणुकीत 9673 केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijit Banerjee Esther Duflo and Michael Kremer won Nobel Prize 2019 in Economics