
ब्रिटनमध्ये लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कोरोना निर्मूलनासाठी कंबर कसली आहे. नवी स्तरीय पद्धत तीन फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, तसेच कनिष्ठ सभागृहात विरोध होऊ नये म्हणून खासदारांनीही प्रयत्न करावेत असे जॉन्सन यांनी सांगितले.
लंडन - ब्रिटनमध्ये लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी कोरोना निर्मूलनासाठी कंबर कसली आहे. नवी स्तरीय पद्धत तीन फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, तसेच कनिष्ठ सभागृहात विरोध होऊ नये म्हणून खासदारांनीही प्रयत्न करावेत असे जॉन्सन यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सध्याचे लॉकडाऊन येत्या बुधवारी संपत आहे. त्यानंतर नवी पद्धत लागू होईल, जी जास्त कडक असेल आणि तिच्या कालबाह्यतेची मुदत तीन फेब्रुवारीच्या आधी नसेल. त्यामुळे जॉन्सन यांच्या पुराणमतवादी पक्षाचेच खासदार नाराज आहेत. येत्या मंगळवारी त्यावर मतदान होईल. लेबर पक्षाने आपली भूमिका अद्याप नक्की केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांनी खासदारांना पत्रच लिहिले. त्यांनी म्हटले आहे की, डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल होऊ शकतील. त्यानंतर खासदारांना जानेवारीत पुन्हा त्याबाबत मतदान करता येईल. स्तरीय पद्धत फेब्रुवारीत संपू शकेल.
एक-एक करुन इराणच्या शास्त्रज्ञांना संपवण्यामागे कोणाचा हात? जाणून घ्या
पत्राची साईड इमेज-शॅडो जनतेच्या पत्रातील मुद्दे
बापरे, भयानकचं! पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत
ईस्टरवर आशा, पण...
ईस्टर सणापर्यंत म्हणजे पुढील वर्षी चार एप्रिलपर्यंत जीवन साधारपणपणे पूर्वीसारखे होण्याची खरीखुरी संधी असल्याची आशा जॉन्सन यांना वाटते. त्याचवेळी नवी स्तरीय पद्धत लागू केली नाही तर राष्ट्रीय आरोग्य संस्थेवर ताण पडून अनर्थ ओढवणारे परिणाम होतील अशा इशाराही त्यांनी दिला.
बहुतांश देशात तीव्र स्तर
43 कामगारांना रस्सीने बांधलं, गळा चिरला, आठ जण बेपत्ता; 'बोको हराम'चा निर्दयीपणा कायम
लसीकरणासाठी नवे आरोग्य मंत्री
शनिवारी लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा असल्यामुळे ब्रिटनमध्ये पूर्वतयारीला वेग आला आहे. त्याचा एक भाग म्हणून नधीम झाहावी यांची नवे आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- नधीम झाहावी
एकूण डोस ३५ कोटी ७० लाख
आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की, मॉडर्ना लशीचे अतिरिक्त २० लाख डोस आम्ही मिळविले आहेत. या कंपनीचे एकूण डोस ३५ लाख लोकांना पुरतील. आता सात वेगवेगळ्या संशोधकांच्या लशींचे एकूण ३५ कोटी ७० लाख डोस आमच्याकडे आहेत. आमच्या वैद्यकीय नियामक संस्थेची मान्यता मिळताच लसीकरण सुरू होईल. सर्वाधिक फायदा होणाऱ्यांना आधी लस दिली जाईल.
- मॅट हॅनकॉक
कॅबिनेट कार्यालयाचा इशारा
आणखी निर्बंध लादले नाहीत तर रुग्णालयांत गर्दी वाढेल. त्यामुळे देशातील दोन कोटीहून जास्त लोकांना कडक निर्बंधांचे पालन करावे लागेल. देशातील संसर्गाची स्थिती असह्य आणि भितीदायकरित्या वाढते आहे, असा इशारा कॅबिनेट कार्यालयाचे मंत्री मायकेल गोव्ह यांनी दिला.
- मायकेल गोव्ह
दीडशे निदर्शकांना अटक
शनिवारी लंडन पोलिसांनी १५५ निदर्शकांना अटक केली. लॉकडाउनप्रमाणेच लशीलाही विरोध होत आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला, अंमली पदार्थ बाळगणे, निर्बंधांचा भंग अशा विविध कारणांसाठी अटक करण्यात आली. मध्य लंडनमधील वेस्ट एन्ड, वेस्टमिन्स्टरजवळील सेंट जेम्स पार्क अशा ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे. सुमारे तीनशे ते चारशे निदर्शकांनी फलक झळकावून सरकारचा निषेध केला. निदर्शकांनी भरलेल्या अनेक बस पोलिसांनी रोखल्या आणि त्यांना परतण्याचा आदेश दिला.
Edited By - Prashant Patil