
'ख्रिस, मला माफ कर.. मला माझ्या कृत्याची लाज वाटते'; अखेर विलने मागितली माफी
चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठा मानाचा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर सोहळा एका वेगळ्या विषयाने चर्चेत आला. ऑस्कर सोहळ्याचा होस्ट-अमेरिकन कॉमेडियन ख्रिस रॉक (Chris Rock) याला अभिनेता विल स्मिथने (Will Smith) कानाखाली मारली. ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीची तिच्या (Hollywood News) दिसण्यावरुन थट्टा केली, ती सहन न झाल्यानं विल आक्रमक झाला. त्याबद्दल अॅकडमीची विल स्मिथनी माफीही मागितली आहे. त्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहत विल स्मिथने ख्रिसची देखील जाहीर माफी मागितली. (Actor Will Smith apologies for his behavior at Oscar Academy Awards on Instagram)
हेही वाचा: 'त्या' थपड्डीचा झाला फायदाच! स्टँड-अप कॉमेडी करणारा ख्रिस मालामाल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियालर यूजर्स देखील प्रतिक्रिया देत आहेत.
ऑस्कर अॅकडमीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही स्मिथ यांच्या कृतीचा निषेध करतोय. आम्ही अधिकृतपणे घटनेचा औपचारिक चौकशी करत आहोत तर चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करणार”
हेही वाचा: Russia Ukraine War : चर्चेतूनच युद्ध थांबेल
विल स्मिथने ख्रिसची इन्स्टाग्राम पोस्ट लिहित माफी मागितली. विल स्मिथने लिहीले, “माझ्या कामावर विनोद करणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. परंतु, जेडाच्या मेडीकल स्थितीबद्दल केलेला विनोद मी सहन करु शकलो नाही मी ती माझी भावनिक प्रतिक्रिया होती. ख्रिस, मी तुझी जाहीर माफी मागू इच्छितो. मी चुकीचा होतो. मला माझ्या कृत्याची लाज वाटते आहे. या प्रेमळ आणि दयाळू जगात हिंसेला कुठलेही स्थान नाही.”
हेही वाचा: Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन उद्योजकावर विषप्रयोग
ऑस्कर समारंभात जेव्हा या कृतीनंतर विलनं जेव्हा ऑस्कर स्विकारला तेव्हा त्यानं त्याविषयी माफी मागितली. तो म्हणाला, कुणीही आपल्यावर जेव्हा टीका करतं हे सहन करणं अवघड आहे. मला या गोष्टी सहन होणाऱ्या नाहीत. माझ्याकडून जे काही झालं त्याबद्दल मी माफी मागतो. खरं सांगायचं तर आज मी ऑस्कर जिंकलो म्हणून रडत नाही तर आज जे झालं त्यासाठी मी रडतोय.
53 वर्षांच्या विल्सनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. ज्या चित्रपटासाठी विलला ऑस्कर मिळाला तो किंग रिचर्ड हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना आणि व्हिनस विल्यम्स यांच्या आयुष्यावर आधारित असून त्यामध्ये विल्सनं प्रमुख भूमिका साकारली आहे.
Web Title: Actor Will Smith Apologies For His Behavior At Oscar Academy Awards On Instagram
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..