मॉडर्नाच्या लसीची किंमतही ठरली! जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची दहशत अद्यापही कमी झालेली नाही. लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयानंतर कोरोनाची लाट कमी होतेय असे दिसत असताना विषाणू पुन्हा डोक वर काढताना दिसतोय. युरोपातील काही ठिकाणी दुसरी लाट लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आलाय.

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे संकेतही दिसतात. ही गोष्ट दिलासा देणारी अशी आहे. सर्वच कंपन्या सरकारच्या मदतीने देशाच्या कानाकोपऱ्यात लस पोहचवण्याची तयारी करत आहेत.  

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारतात 1800 ते 2800 रुपयांपर्यंत लस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आता अमेरिकन फार्मा कंपनीनेही लशीच्या किंमती जाहीर केल्या आहेत.  25 ते  37 डॉलर पर्यंत लस उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारच्या मागणीनुसार किंमतीमध्ये चढ-उतार दिसेल, असे संकेतही कंपनीने दिले आहेत.  अमेरिकेतील मॉडर्ना फार्मा कंपनीचे सीईओ स्टेफन बँन्सल  यांनी दिले आहेत.  

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची दहशत अद्यापही कमी झालेली नाही. लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयानंतर कोरोनाची लाट कमी होतेय असे दिसत असताना विषाणू पुन्हा डोक वर काढताना दिसतोय. युरोपातील काही ठिकाणी दुसरी लाट लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आलाय.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

देशातही काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. देशाची राजधानीसह अन्य काही शहरं पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत सर्वकाळी पूर्ववत होणार नाही, अशी चर्चा रंगत असताना उपलब्ध होणारी लस किती रुपयांना मिळणार याचीही प्रत्येक सामान्य नागरिकांना उत्सुकता आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After serum Moderna announced price of Corona vaccine know how much money be paid