साडेसात लाख कॅन्सरच्या प्रकरणांमागे 'दारु' हे कारण; संशोधनाचा दावा

साडेसात लाख कॅन्सरच्या प्रकरणांमागे 'दारु' हे कारण; संशोधनाचा दावा

नवी दिल्ली : अनेकांना दारुचं व्यसन असतं. दारु पिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. मात्र, अल्कोहोल आणि कॅन्सर होणे यामध्ये जवळचा संबंध असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. २०२० मधील जवळपास ७००,००० नव्या कॅन्सर रुग्णांचा संबंध अल्कोहोलच्या सेवनाशी असल्याचं निष्पन्न झालंय. या काळात अमेरिकनांनी अल्कोहोलचं सर्वाधिक सेवन केलं आहे. लॅन्सेट ऑन्कोलॉजीच्या 13 जुलैच्या आवृत्तीत प्रकाशित झालेल्या संशोधनात असं दिसून आलंय की, 2020 मध्ये 4% पेक्षा जास्त नवीन कॅन्सर प्रकरण अल्कोहोलच्या सेवनामुळे होते. अल्कोहोलच्या सेवनाशी निगडीत बहुतांश कॅन्सर हे दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा पिणाऱ्या लोकांमध्ये आढळून आलेत, जगभरात 100,000 पेक्षा जास्त प्रकरणे अशा लोकांमध्ये होती ज्यांची सरासरी त्यापेक्षा कमी होती, असे अभ्यासात म्हटलंय.

साडेसात लाख कॅन्सरच्या प्रकरणांमागे 'दारु' हे कारण; संशोधनाचा दावा
पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले केजरीवाल कोसळले मंचावरुन

अल्कोहोल त्रासदायक आहे. हे आपल्या तोंडाच्या, आपल्या घशाच्या, आपल्या पोटाच्या आतील अस्तरांसाठी त्रासदायक ठरतं. या त्रासामधून आपले शरीर बरं होण्यासाठी प्रयत्न करतं राहतं मात्र, काहीवेळा ते असामान्य मार्गानी बरे होते, ज्यामुळे ती कॅन्सरची सुरुवात ठरु शकते, असं नॉर्थवेस्टर्न मेडिसिनचे थोरॅसिक सर्जन डॉ. डेव्हिड ओडेल म्हणाले. पुरुषांमध्ये अल्कोहोलशी संबंधित कर्करोगाचे तीन चतुर्थांश निदान झालं. यातील बहुतेक प्रकरणे ही यकृत आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची होती. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वात जास्त आढळून आला.

साडेसात लाख कॅन्सरच्या प्रकरणांमागे 'दारु' हे कारण; संशोधनाचा दावा
श्रीरामाचा जयघोष न करणाऱ्यांच्या DNAवर शंका - योगी आदित्यनाथ

कोरोना साथीच्या काळात अल्कोहोलचे सेवन वाढल्याने नवीन निष्कर्ष समोर आले आहेत. गेल्या वर्षी सर्वेक्षण केलेल्या जवळजवळ दोन तृतीयांश अमेरिकन लोकांनी सांगितलंय की त्यांचं मद्यपान आधीपेक्षा वाढले आहे. बरेच लोक जे अल्कोहोलचा वापर आपल्या दुसऱ्या अडचणींशी सामना करण्यासाठी करत असतात, त्यांचं साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यावर मद्यपान लक्षणीयरित्या वाढल्याचं आढळलंय, असं मत न्यूयॉर्कमध्ये व्यसनमुक्ती उपचार कार्यक्रम चालवणाऱ्या मानसशास्त्रज्ञ सारा चर्च यांनी मांडलंय. त्या म्हणाल्या की, सध्या मदत मागणाऱ्यांमध्ये अशा लोकांचा समावेश जास्त आहे, ज्यांनी कोरोना साथीच्या आजारापूर्वी जास्त मद्यपान केलेलं नाहीये. मद्यपान आणि अल्कोहोलशी संबंधित कर्करोगाचे निदान होण्यात अंदाजे 10 वर्षांचा अंतर आहे, म्हणून डॉक्टर म्हणतात की, यामधील कोरोना साथीचा प्रभाव अस्पष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com