
जगातील 99 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत घेतेय श्वास; WHOची माहिती
जवळजवळ संपूर्ण जगाच्या 99 टक्के लोकसंख्या प्रदूषित हवेत श्वास घेते ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.त्यामुळे हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे, असेही संघटनेने म्हटले आहे. (Almost the entire world's population 99 percent breaths in polluted air)
हेही वाचा: तब्बल 80 कोटी रुपयांचा घोटाळा उघड; दिल्ली पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या
117 देशांमधील 6,000 हून अधिक शहरांची विक्रमी संख्येत हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले तर या शहरातील रहिवासी दुषित कण आणि नायट्रोजन डायऑक्साइडच्या (NO2) असुरक्षित हवेत श्वास घेत असल्याचे समोर आले आहेत. यावर भर म्हणून जीवाश्म इंधनाचा (fossile Fuel) वापर कमी करून आणि इतर ठोस उपक्रम राबवून वायू प्रदूषण पातळी कमी करण्याच्या गरजेवर जागतिक आरोग्य संघटनेने भर दिलाय.
हेही वाचा: PM मोदींच्या अन्न सुरक्षा योजनेमुळे गरिबीत होणारी वाढ टळली : IMF
डब्ल्यूएचओच्या पर्यावरण, हवामान बदल आणि आरोग्य संचालक मारिया नीरा यांनी सांगितले की, जगातील जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा प्रदुषित हवेत श्वास घेत आहे. सार्वजनिक आरोग्याचा हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी संस्थेच्या शेवटच्या अहवालात असे आढळून आले की जगातील 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या वायू प्रदूषणाने त्रस्त आहे.
हेही वाचा: BJPच्या वर्धापनदिनी PM मोदींचा घराणेशाहीवर हल्ला; म्हणाले, वोट बँकेचं राजकारण...
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या हानी झपाट्याने वाढत आहे. युनायटेड नेशन्स डेटाने गेल्या वर्षी सूचित केले होते की लॉकडाउन आणि प्रवासावरील निर्बंधांमुळे हवेच्या गुणवत्तेत अल्पकालीन सुधारणा झाली होती मात्र आता पुन्हा हवेच्या गुणवत्ता घसरली आहे.
Web Title: Almost The Entire Worlds Population 99 Percent Breaths In Polluted Air
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..