डोनाल्ड ट्रम्पनंतर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना कोरोनाची लागण

Barack Obama Narendra Modi
Barack Obama Narendra Modiesakal
Summary

अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात सुमारे 35,000 लोकांना संसर्ग झाला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झालीय. खुद्द ओबामा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. ट्विटव्दारे माहिती देताना ओबामा यांनी लिहिलंय, मला कोरोनाची लागण झालीय. गेल्या काही दिवसांपासून माझा घसा खवखवत होता, पण मी त्याकडं दुर्लक्ष केलं. मात्र, निदान झाल्यानंतर कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. मिशेल आणि मी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच आम्ही दोघांनी बूस्टर डोस देखील घेतलाय. परंतु, मिशेलला (Michelle Obama) कोरोनाची लागण झाली नसल्याचंही ओबामांनी स्पष्ट केलं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बराक ओबामांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये केलंय, बराक ओबामा.. तुम्ही लवकरात-लवकर बरे व्हा आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू दे, असं त्यांनी नमूद केलंय. अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात सुमारे 35,000 लोकांना संसर्ग झाला आहे, तर जानेवारीच्या मध्यात ही संख्या सुमारे आठ लाख होती.

Barack Obama Narendra Modi
कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांचा भीषण कार अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

60 वर्षीय बराक ओबामा हवाईमध्ये बराच काळ घालवून नुकतेच ते वॉशिंग्टनला परतले आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यानंतर बराक ओबामा हे अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झालीय. डोनाल्ड ट्रम्प यांना ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळी कोरोनाची लस बहुतेक लोकांना उपलब्ध नव्हती. केंद्राच्या अहवालानुसार, 75.2 टक्के अमेरिकन प्रौढांनी कोरोना लसीचे सर्व डोस घेतलेत, तर 47.7 टक्के लोकांना बूस्टर डोस मिळालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com