अमोनियम नायट्रेट - वरदायी आणि विनाशकारीही

यूएनआय
Saturday, 8 August 2020

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये अमोनियम नायट्रेटच्या स्फोटाने दीडशेवर बळी घेतले, चार हजारांवर जखमी आणि लाखो बेघर झाले. सहा वर्षे साठवून ठेवलेल्या २,७०० टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटाने हाहाकार उडाला. यापूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये (१९४७) जहाजातल्या सुमारे २३०० टन (२० लाख ८६ हजार किलो) अमोनियम नायट्रेटने सिगारेटचे थोटूक पडल्यानंतर पेट घेतला. त्याने १० मैल परिसरातील (१६ किलोमीटर) लोकांना धक्का बसला होता. या रसायनाविषयी...

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये अमोनियम नायट्रेटच्या स्फोटाने दीडशेवर बळी घेतले, चार हजारांवर जखमी आणि लाखो बेघर झाले. सहा वर्षे साठवून ठेवलेल्या २,७०० टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटाने हाहाकार उडाला. यापूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये (१९४७) जहाजातल्या सुमारे २३०० टन (२० लाख ८६ हजार किलो) अमोनियम नायट्रेटने सिगारेटचे थोटूक पडल्यानंतर पेट घेतला. त्याने १० मैल परिसरातील (१६ किलोमीटर) लोकांना धक्का बसला होता. या रसायनाविषयी...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे असते अमोनियम नायट्रेट 
रासायनिक सूत्र – NH4NO3.  
अमोनियम नायट्रेट नैसर्गिकरित्या आढळते. पांढरेशुभ्र स्फटिकासारखे घनस्वरूपात असते. ‘सॉल्टपेट्रे’ असेही त्याला संबोधतात. लॅटिन अमेरिकेतील चिली देशाच्या अटाकामा वाळवंटात त्याचे जगातील मोठे साठे आहेत. आजमितीला सगळीकडे अमोनिया आणि नायट्रिक अॅसिड यांच्या संयुगातून अमोनियम नायट्रेट बनवतात. यात ३४ टक्के नायट्रोजन असल्यानेच खत म्हणून वापर करतात. अमोनियम नायट्रेट फ्यूएल ऑईल (एएनएफओ) औद्योगिक क्षेत्रात स्फोटक म्हणून वापरतात. ते खाणकाम, बांधकाम क्षेत्रात वापरतात, अमेरिकेतच याचा ८० टक्के वापर होतो. अमोनियम नायट्रेटच्या साठ्यावर बहुतांश देशांत निर्बंध आहेत. 

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

खतासाठी वापर
नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअम रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असतात, यात ‘एन’ ‘पी’ ‘के’ यांचे प्रमाण निश्‍चित असते. खतातील नायट्रोजनचे प्रमाण वाढविण्यासाठी अमोनियम नायट्रेट वापरतात. ते अत्यंत ज्वलनशील असते. अमोनिअम नायट्रेट विघटीत होऊन त्याचे रूपांतर - नायट्रोजन, ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ यांच्यात होते.

कोरोनाविरोधात 'चमत्कारिक लस' तयार केल्याचा इस्त्राईलचा दावा

भारतातील नियम 
आपल्या देशात स्फोटके कायदा-१८८४ अंतर्गत ‘अमोनियम नायट्रेट नियम-२०१२’ बनवलाय. अमोनियम नायट्रेटचे उत्पादन, रूपांतर, पॅकिंग, बॅगिंग, आयात व निर्यात, वाहतूक, ताब्यात ठेवणे यावर या नियमान्वये बंधने आहेत. ज्या इमल्शन, सस्पेन्शन, मेल्ट, जेल यांच्यात ४५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात अमोनियम नायट्रेट आहे, त्यातून ते काढून घेता येणार नाही. त्याचे ऑक्सिडायझर (ग्रेड ५.१) असे वर्गीकरण केले आहे. नागरी वस्तीत किंवा तिच्याजवळ मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट साठवणे बेकायदा आहे. अमोनियम नायट्रेटशी संबंधित कोणत्याही कृतीसाठी परवानगी घ्यावी लागते. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अॅक्ट १९५१ अन्वये त्यासाठी परवाना दिला जातो. 

21 दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाखांहून 20 लाखांच्या घरात

भारतातही विध्वंसक वापर
जगात दहशतवादी कारवायांसाठी इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवण्यासाठी ‘एएनएफओ’ मुख्य स्फोटक म्हणून वापरतात. देशात पुलवामा, वाराणसी, मालेगाव, पुणे, दिल्ली (२०११), हैदराबाद (२०१३) आणि मुंबईतील स्फोटासाठी अमोनियम नायट्रेट वापरले होते. हे स्फोट आरडीएक्स किंवा टीएनटीचे होते. 

दहशतवाद्यांकडून वापर

  • १९९२ : आयरिश रिपब्लिक आर्मीने एक टन फर्टिलायझर बाँबचा वापर लंडनमधील बाल्टिक एक्सचेंज इमारतीत केला, त्यात तिघे ठार. १९९३ आणि १९९६ मध्येही लंडनमध्ये असेच स्फोट घडवले. 
  • एप्रिल १९९५ - ओकलाहोमा शहरात अमोनियम नायट्रेटने भरलेला ट्रक उडवून दिला, यात १६८ ठार. 
  • २००२ - बालीतील नाईटक्लबमध्ये स्फोटात २०२ जणांचा मृत्यू. 
  • २००१ - टाऊसिली (फ्रान्स) येथील रसायन कारखान्यातील अपघाती स्फोटात ३१ मृत. 
  • २०११ - ओस्लोतील अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात आठजणांचा मृत्यू. 
  • २०१३ - टेक्सासच्या (अमेरिका) खत प्रकल्पातील स्फोटात १५ ठार. 
  • १२ ऑगस्ट २०१५ ः चीनमधील तियानजिन बंदरातील स्फोटात ३०० इमारती उद्ध्वस्त झाल्या. ८०० टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात १७३ मृत्य.

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ammonium nitrate Both generous and destructive