बांगलादेशकडून मुखर्जींना श्रद्धांजली, पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीर केला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 1 September 2020

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी प्रणव मुखर्जींचा उल्लेख 'भारताचे प्रख्यात राजकारणी आणि बांगलादेशचा खरा मित्र' असा केला.

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे  वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून ते दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर प्रत्येक क्षेत्रातील लोकांकडून समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला जात आहे. यातच भारताचा शेजारी असणारा देश बांगलादेशने प्रणव मुखर्जींच्या निधनामुळे बुधवारी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. प्रणव मुखर्जी यांच्या सन्मानार्थ २ सप्टेंबरला बांगलादेशच्या पीपल्स रिपब्लिकचा राष्ट्रीय ध्वज अर्धवट उतरवला जाईल. बांगलादेशकडून जारी शोक संदेशात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रणव मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Pranab Mukherjee Funeral Updates: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या पार्थिवावर दुपारी होणार अंत्यसंस्कार

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला. तसेच त्यांनी प्रणव मुखर्जींचा उल्लेख 'भारताचे प्रख्यात राजकारणी आणि बांगलादेशचा खरा मित्र' असा केला. प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना शेख हसीना यांनी वंगबंधूबरोबरच्या त्यांच्या अनेक आठवणीही सांगितल्या आहेत.

अग्रलेख : महत्त्वाकांक्षी कर्मयोगी

बांग्लादेश मुक्तीसंग्रामातील प्रणव मुखर्जी यांचे महत्वपुर्ण योगदान कधीही विसरले जाणार नाही, मी त्यांचे मुक्तिसंग्रामातील उल्लेखनीय योगदान कायम लक्षात ठेवेन. राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी यांनी भारतात हद्दपार असताना आम्हाला नेहमीच पाठिंबा दर्शविला होता, " अशी माहितीही शेख हसीना यांनी दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने भारताने एक हुशार राजकारणी व देशभक्त नेता आणि बांगलादेशने आपला प्रिय व्यक्तीही गमावला आहे. प्रणव मुखर्जी भारताच्या राजकारणातील एक चमकणारा तारा म्हणून नेहमी ओळखले जातील, असेही शेख हसीना म्हणाल्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangladesh announces national mourning in honour of pranab mukherjee