Swaminarayan Temple: भारताबाहेर बांधण्यात आलेलं सर्वात मोठं हिंदू मंदिर; १० हजार शिल्पे, १२ उपमंदिरे अन् बरंच काही! जाणून घ्या वैशिष्ट्ये

हे मंदिर १८३ एकरात पसरलेलं आहे.
Swaminarayan Temple Outside India
Swaminarayan Temple Outside IndiaSakal

भारताच्या बाहेर बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचं उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी न्यू जर्सीमध्ये होणार आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरपासून जवळपास ९० किलोमीटर दक्षिणेकडे, तसंच वॉशिंग्टन डीसीपासून जवळपास २८९ किलोमीटर अंतरावर बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर बनवण्यात आलं आहे.

हे हिंदू मंदिर न्यू जर्सीच्या छोटे रॉबिन्सवाले टाऊनशिपमध्ये बनवण्यात आलं आहे. हे मंदिर बनवण्यामध्ये १२ हजारांहून जास्त कार्यकर्त्यांचं योगदान आहे. या हिंदू मंदिराबद्दलची काही वैशिष्ट्ये जाणून घ्या...

मंदिराची रचना प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनुसार केली आहे आणि त्यात १०,००० शिल्पे आणि पुतळे, भारतीय संगीत वाद्ये आणि नृत्य प्रकारांचे कोरीवकाम यासह प्राचीन भारतीय संस्कृतीतील रचना आहेत. हे मंदिर अंगकोरवाट नंतर कंबोडियातलं दुसरं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे.

१२व्या शतकातील अंगकोरवाट मंदिर परिसर हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. हे मंदिर ५०० एकरमध्ये पसरलेलं आहे आणि आता ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर, जे नोव्हेंबर २००५ मध्ये लोकांसाठी खुलं करण्यात आलं होतं, ते १०० एकरमध्ये पसरलेलं आहे.

Swaminarayan Temple Outside India
Trending News: कुत्रा आहे की कोल्हा? जगात पहिल्यांदाच आढळला असा अनोखा जीव..

अक्षरधाम हे पारंपारिक हिंदू मंदिर वास्तुकलेसह बांधलेलं आहे. या अनोख्या हिंदू मंदिराच्या रचनेत मुख्य मंदिर, १२ उप-मंदिरे, नऊ शिखरे (शिखरांसारखी रचना) आणि नऊ पिरॅमिडल शिखरे यांचा समावेश आहे. अक्षरधाममध्ये पारंपारिक दगडी स्थापत्यशास्त्रात बांधलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा लंबवर्तुळाकार घुमट आहे.

या मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की हजार वर्षांपर्यंत काहीही होणार नाही. अक्षरधामच्या प्रत्येक दगडाची एक कथा आहे. मंदिर बांधण्यासाठी निवडलेल्या चार प्रकारच्या दगडांमध्ये चुनखडी, गुलाबी सँडस्टोन, संगमरवरी आणि ग्रॅनाइट यांचा समावेश होतो, जे अति उष्णता आणि थंडी सहन करू शकतात.

Swaminarayan Temple Outside India
Ganeshotsav 2023: ३२० वर्षांची परंपरा, २१ दिवस बसणारा खवळे गणपती; विसर्जनाच्या दिवशी होते पिंडदान; जाणून घ्या इतिहास

या हिंदू मंदिराच्या बांधकामात अंदाजे दोन दशलक्ष घनफूट दगड वापरण्यात आले होते आणि जगभरातील विविध ठिकाणांहून आणले गेले होते, ज्यात बल्गेरिया आणि तुर्कीमधून चुनखडी, ग्रीस, तुर्की आणि इटलीमधून संगमरवरी, भारत आणि चीनमधील ग्रॅनाइट, भारतातील सँडस्टोन आणि इतर सजावटीचे दगड युरोप, आशिया, लॅटिन अमेरिकेतून आणले आहेत.

या मंदिराच्या ब्रह्मकुंडमध्ये पारंपारिक भारतीय पायरी विहीर आहे, ज्यामध्ये भारतातील पवित्र नद्यांसह आणि अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांसह जगभरातील ३०० हून अधिक जलाशयांचं पाणी आहे. बीएपीएसच्या शाश्वत पद्धतींमध्ये सौर पॅनेल फार्म, फ्लाय अॅश कॉंक्रिट मिक्सिंग आणि गेल्या काही दशकांमध्ये जगभरात २ दशलक्षाहून अधिक झाडे लावण्याचा समावेश आहे.

Swaminarayan Temple Outside India
Ganeshotsav 2023: कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदीर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

अक्षरधाम उभारणीसाठी संपूर्ण अमेरिकेतील स्वयंसेवकांनी मदत केली आहे. त्यांना भारतातील कारागीर स्वयंसेवकांनी मार्गदर्शन केलं. अक्षरधामच्या उभारणीसाठी लाखो स्वयंसेवकांनी योगदान दिलं आहे. पश्चिम गोलार्धातील हिंदू संस्कृती आणि स्थापत्यकलेची खूण समजल्या जाणाऱ्या अक्षरधामचे ८ ऑक्टोबर रोजी महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली औपचारिक उद्घाटन होणार आहे. १८ ऑक्टोबरपासून ते पर्यटकांसाठी खुलं होणार आहे.

या मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्वयंसेवकांनी लाखो तास निस्वार्थीपणे मंदिरासाठी समर्पित केले आहेत. यामध्ये १८ वर्षे ते ६० वर्षांवरील विद्यार्थी, कंपन्यांचे सीईओ, डॉक्टर, अभियंते आणि आर्किटेक्ट यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी काही महिन्यांपासून कामावरून सुट्टी घेतली आहे आणि मंदिराच्या बांधकामात त्यांची सेवा देण्यासाठी बांधकाम साइटजवळ भाड्याने खोल्या घेतल्या आहेत.

स्वामीनारायण संस्थेचे अक्षरवत्सलदास स्वामी यांनी एका मुलाखतीत पीटीआयला सांगितलं की, आमच्या अध्यात्मिक नेत्याची (प्रमुख स्वामी महाराज) दृष्टी होती की पश्चिम गोलार्धात असं एक स्थान असावं जे केवळ हिंदूंसाठीच नाही तर जगातील सर्व लोकांसाठी एक स्थान असावे. केवळ भारतीयांसाठीच नाही, काही विशिष्ट गटांसाठीच नाही; हे सर्व जगासाठी व्हायला हवं. जिथे लोक येऊन हिंदू परंपरेवर आधारित काही मूल्ये, वैश्विक मूल्ये शिकू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com