Trending News: कुत्रा आहे की कोल्हा? जगात पहिल्यांदाच आढळला असा अनोखा जीव..

हा प्राणी ब्राझीलमध्ये एका गाडीखाली आल्याने जखमी झाला आणि त्यानंतर या प्राण्याबद्दलची माहिती मिळाली आहे.
Dog and Fox mix breed
Dog and Fox mix breedSakal

जगात पहिल्यांदाच असा एक प्राणी आढळून आला आहे जो अर्धा कुत्रा तर अर्धा कोल्हा आहे. म्हणजे कुत्रा आणि कोल्ह्याचा क्रॉसब्रीड. त्यामुळे या प्राण्याचा डॉग्जिम असं नाव देण्यात आलं आहे. हा प्राणी ब्राझीलमध्ये एका गाडीखाली आल्याने जखमी झाला आणि त्यानंतर या प्राण्याबद्दलची माहिती मिळाली आहे. ही एक मादी असून या प्राण्यावर सध्या संशोधन सुरू आहे.

डॉग्जिमचा जनुकीय डेटा सध्या गोळा केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या प्राण्याची आई पॅम्पाज जमातीचा कोल्हा असून वडील एक पाळीव कुत्रा आहेत. वैज्ञानिकांना या प्राण्यामध्ये कुत्रा आणि कोल्हा दोघांचीही जनुके आढळली आहेत. यामुळे या प्राण्याचं शरीर, रंग सर्वकाही दोन्ही प्राण्यांसारखं आहे. या प्राण्यामध्ये दोन्ही प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत.

Dog and Fox mix breed
Trending News: एकाच वेळी १६ ठिकाणी करायची नोकरी; पगारातून बंगलाही घेतला; कसं फसवलं कंपन्यांना?

या प्राण्याचे कान लांब, टोकदार आणि केसाळ आहेत. तसंच याचं तोंडही निमुळतं आहे. क्रॉसब्रीड असला तरीही हा प्राणी माणसाला घाबरत नाही. उलट तो माणसाच्या जवळ येतो. माणसांच्या अंगाखांद्यावर खेळतो. या प्राण्याला थोपटलं तर तो अगदी मांडीवर येऊनही बसतो. वैज्ञानिकांनी याला जेवण दिलं, तर त्याने ते खाल्लं नाही. पण त्याने जिवंत उंदीर मात्र खाल्ले आहेत.

हा प्राणी कुत्र्याप्रमाणेच भुंकतो. काही वेळ खेळण्यांसोबतही खेळला. पण याचं चालणं कोल्ह्यासारखं आहे. या प्राण्यावर उपचार करणाऱ्या फ्लाविया फरारी यांनी सांगितलं की हा एक अनोखा प्राणी आहे. हायब्रीड असूनही हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एखाद्या रानटी कुत्र्यामध्ये जी आक्रमकता असते, ती या प्राण्यामध्ये नाही. हा लाजाळू प्राणी आहे.

Dog and Fox mix breed
Trending News: फक्त ९८ पानांचं पुस्तक; पण तुम्ही हातात घेऊन वाचूही शकणार नाही; काय आहे कारण?

हा प्राणी आपल्यावर उपचार करणाऱ्या लोकांमध्ये मात्र मिसळून गेला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे कोल्हा आणि कुत्र्याच्या क्रॉसब्रीड असलेल्या प्राण्याची माहिती मिळाली आहे. जनुकीय चाचणीमध्ये असं आढळून आलं आहे की या प्राण्यामध्य ७६ क्रोमोसोम्स आहेत. पण कोल्ह्यामध्ये ७४ तर कुत्र्यामध्ये ७८ क्रोमोसोम्स असतात. डॉक्टरांच्या टीमने या प्राण्याबद्दल एनिमल्स जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com