
पाकिस्तामधील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या डाउनने पोलिस प्रवक्ता सजिदुल हसन यांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, एका वीजेच्या खांबावर विस्फोटक सेट करण्यात आले होते.
रावळपिंडी : पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयाच्या परिसराजवळ बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून जवळपास 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे वृत्त आहे. शहरातीलसदर परिसरात घडलेली घटनाही पाकिस्तानी लष्करी मुख्यालयापासून खूप दूर नव्हती. त्यामुळे या घटनेने पाकिस्तानमध्ये एकच खळबळ माजली आहे.
काश्मीर खोऱ्यात लष्करी जवानांकडून ट्रिपल अॅटक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तामधील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या डाउनने पोलिस प्रवक्ता सजिदुल हसन यांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, एका वीजेच्या खांबावर विस्फोटक सेट करण्यात आले होते. या धमाक्याने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने याठिकाणी बचाव कार्यासाठी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅबने घटनेच्या ठिकाणचे पुरावे गोळा केले असून याप्रकरणातील तपास सुरु आहे. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींची गय केली जाणार नाही, असे प्रवक्त्याने म्हटले आहे.
कोरोनावरील लस पुढच्या सहा महिन्यांत शक्य; संशोधन शेवटच्या टप्प्यात
पाकिस्तान सध्या कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. बॉम्बस्फोट घडवण्यामागचा नेमका हेतू काय होता, याबाबतही कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरक्षा कर्मचारी याचा तपास करत आहेत. पाकिस्तानातील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोट हा या परिसरात उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या माध्यमातून करण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिसर सील केला होता.