डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाच्या पहिल्याच दिवशी तब्बल एवढ्या प्रती विकल्या गेल्या

यूएनआय
Sunday, 19 July 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाची पहिल्याच दिवशी तडाखेबंद विक्री झाली. पुतणी मेरी हिने लिहीलेल्या पुस्तकाच्या जवळपास साडेनऊ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

न्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गर्विष्ठ आणि अज्ञानी संबोधणाऱ्या पुस्तकाची पहिल्याच दिवशी तडाखेबंद विक्री झाली. पुतणी मेरी हिने लिहीलेल्या पुस्तकाच्या जवळपास साडेनऊ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टू मच अँड नेव्हर इनफ - हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन असे पुस्तकाचे नाव आहे. डोनाल्ड यांचे सर्वांत मोठे बंधू फ्रेड यांची ती मुलगी आहे. ती मानसशास्त्रज्ञ आहे. ट्रम्प हे आत्मपूजक आहेत आणि याबाबतीत त्यांनी इतके टोक गाठले आहे की चिकित्सात्मक उपचार द्यावे लागण्याच्या स्थिती त्यांनी निर्माण केली आहे, असा उल्लेख केला आहे.

नेपाळ काही सुधरेना; भारतासोबत पुन्हा काढली खुसपट

दरम्यान, हे पुस्तक म्हणजे असत्य गोष्टींचे संकलन आहे, अशी प्रतिक्रिया व्हाइट हाऊसतर्फे देण्यात आली. डोनाल्ड यांचे लहान भाऊ रॉबर्ट प्रकाशन रोखण्यासाठी न्यायालयात गेले होते. २००१ मध्ये मेरीच्या आजोबांच्या संपत्तीची वाटणी झाल्यानंतर एक करार झाला होता. त्यानुसार कौटुंबिक व काही बाबी उघड करायच्या नाहीत असे ठरले होते. मेरी पुस्तकाद्वारे या कराराचा भंग करीत असल्याचा युक्तिवाद त्यांच्या अर्जात करण्यात आला होता, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. हे पुस्तक सायमन अँड शुस्टर पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. पारंपरिक कागदी स्वरुपासह प्रकाशनपूर्व नोंदणी, ध्वनीफीत तसेच डिजीटल मिळून साडे नऊ लाख प्रतींची विक्री या कंपनीच्या इतिहासात विक्रमी ठरली. फक्त अमेरिकेसाठी आणखी प्रती छापल्या जाणार असून एकूण आकडा १.१५ दशलक्ष होईल. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांत अॅमेझॉनवरही पुस्तकाची सर्वाधिक विक्री झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: book which called Donald Trump proud and ignorant sold so many copies on its first day