esakal | ब्रिटनने भारताला टाकलं 'रेड लिस्ट'मध्ये; पाक-बांगलादेशचाही समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

britain airport

ब्रिटनने सोमवारी भारताला 'रेड लिस्ट' देशांमध्ये टाकले आहे. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासावर बंदी आली आहे. असे असले तरी ब्रिटिश नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे

ब्रिटनने भारताला टाकलं 'रेड लिस्ट'मध्ये; पाक-बांगलादेशचाही समावेश

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

लंडन- ब्रिटनने सोमवारी भारताला 'रेड लिस्ट' देशांमध्ये टाकले आहे. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासावर बंदी आली आहे. असे असले तरी ब्रिटिश नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. त्यांना ब्रिटनमध्ये येण्यास परवानगी असेल. विशेष म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच भारत दौरा रद्द केला आहे. भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. रेड लिस्ट देशांमधून येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना सरकारी क्वारंटाईन केंद्रामध्ये राहण्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. त्यांना 10 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. पाकिस्तान आणि बांगलादेशचाही रेड लिस्ट देशांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा: हाँगकाँग प्रकरणात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मांडली महत्वाची भूमिका

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द

भारतातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुढील आठवड्यातील भारत दौरा रद्द केला आहे. याबाबतचे वृत्त ‘डोविंग स्ट्रीट’ ने दिले आहे.भारत आणि ब्रिटनकडून प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जॉन्सन दूरध्वनीवरून संवाद साधतील. भारत - ब्रिटनमधील परस्परसहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत उभय देशांतील नेत्यांमध्ये चर्चा होईल. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या वर्षात नंतर ते भारत दौऱ्यावर येतील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे भारत दौरा रद्द करण्यासाठी जॉन्सन यांच्यावर दबाव वाढत होता. ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षानेही त्यांना दौरा रद्द करून झूमद्वारे बैठक घेण्याचे आवाहन केले होते. यापूर्वीही, जानेवारीत प्रजासत्ताक दिनाचा जॉन्सन यांचा दौरा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता.