महाराष्ट्रापाठोपाठ ब्रिटनमध्येही राजकीय 'भूकंप' होणार; PM जॉन्सन राजीनामा देणार?

ब्रिटनचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनदेखील राजीनामा देऊ शकतात.
बोरिस जॉन्सन.
बोरिस जॉन्सन.
Updated on

लंडन : महाराष्ट्रा पाठोपाठ आता ब्रिटनमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनदेखील (Boris Johnson) राजीनामा देऊ शकतात असे सांगितले जात आहे. देशातील 2 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरील दबाव वाढला असून, जॉन्सन यांच्या राजीनाम्याच्या (Resign) मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे जॉन्सस यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. (Boris Johnson News In Marathi)

बोरिस जॉन्सन.
Amravati Murder Case: क्रुरतेचा कळस! मानेची जखम ८.2 सेमी खोल; मणक्यापर्यंत घाव

ऋषी सुनक यांनी राजीनामा का दिला?

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक (Rushi Sunak) यांनी मंगळवारी राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन यांच्या देशाच्या हितासाठी कारभार करण्याच्या क्षमतेवर अनेक खासदारांचा आणि जनतेचा विश्वास उडाला आहे, असे सुनक यांचे मत आहे. सुनक यांनी ट्विट करून लिहिले की, जनतेची सरकारकडून योग्य आणि सक्षम पद्धतीने चालवावे अशी इच्छा आहे. सरकारमधून बाहेर पडल्याचे दु:ख होत असल्याचेही सुनक यांनी ट्वीटमध्ये नमुद केले आहे.

बोरिस जॉन्सन.
शरद पवारांच्या भेटीसंदर्भात एकनाथ शिंदेंचा खुलासा; म्हणाले...

राजीनाम्यावर काय म्हणाले आरोग्य मंत्री साजिद जाविद?

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी राजीनाम्यादरम्यान पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली परिस्थिती बदलणे कठीण आहे याबद्दल मला खेद वाटतो. खासदार ख्रिस पिंचर यांच्यावर दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. याप्रकरणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

बोरिस जॉन्सन.
दाऊद - मुंबई बॉम्बस्फोटावर निर्णय घेण्यात ठाकरे सरकार अपयशी- CM एकनाथ शिंदे

पंतप्रधान बोरिस जॉनसन राजीनामा देणार?

मागील महिन्यात ब्रिटनमध्ये सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 50 हून अधिक खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी पंतप्रधान बोरिस जॉन्सन विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात यशस्वी ठरले. सभागृहात 211 पैकी 148 मते बोरिस जॉन्सन यांच्या बाजूने आली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर कोरोना महामारीत लॉकडाऊन दरम्यान पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला होता. ते प्रकरण निवळत नाही तोच आता जॉन्सन सरकारमधील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सरकारसाठी धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com