ब्रिटनचे PM जॉन्सन भारत दौऱ्यावर, महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिलला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Political News
Political Newsgoogle
Summary

दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिलला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 21 एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिलेलं निमंत्रणन स्विकारून बोरिस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर पहिल्यांदाच येत आहेत. गुजरातमधून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. गुजरातमधील गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंधांवर विविध उद्योगपतींना ब्रिटनचे पंतप्रधान भेट देणार आहेत. यानंतर 22 एप्रिलला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या भेटीला ब्रिटनच्या नव्या इंडो-पॅसिफिक धोरणाशीही जोडले जात आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय-ब्रिटिश नागरिकांपैकी निम्म्याहून अधिक गुजराती वंशाचे आहेत. त्यामुळे डायस्पोरा कनेक्ट म्हणूनही ते महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने या दौऱ्यात नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Political News
आधी महाआरती...आज पत्रकार परिषद, राज ठाकरेंचा पुणे दौरा चर्चेत

या भेटीत व्यापार हा विषय मुख्य पटलावर असणार आहे. यापूर्वी मे 2021 मध्ये दोन्ही नेत्यांमध्ये आभासी बैठक झाली होती मात्र त्यावेळी 2030 च्या रोडमॅपवर चर्चा झाली होती. हा रोडमॅप आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील यूके-भारत संबंधांसाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो. या बैठकीवेळी दोन्ही देशांनी संबंधांचा दर्जा 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'मध्ये वाढवण्यासही सहमती दर्शवली होती. सध्या यूके आणि भारत यांच्यातील व्यापार दरवर्षी सुमारे £23 अब्ज इतका आहे. आभासी बैठकीच्या प्रमुख परिणामांपैकी, 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करण्याचे मान्य करण्यात आले.

Political News
केंद्र सरकरानं दिल्लीत शांतता राखावी, CM केजरीवाल यांचे आवाहन

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची ही दुसरी भेट होती आणि 13 महिन्यांतील परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची तिसरी भेट दिली होती. मागील महिन्यात ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणादरम्यान "Wider Diplomatic Push" चे सदस्य म्हणून भारताला भेट दिली होती. ब्रेक्झिटनंतर, ब्रिटन भारताच्या इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमात सामील होईल आणि सागरी सुरक्षा मुद्द्यांवर प्रमुख भागीदार बनेल. हे दक्षिणपूर्व आशियातील प्रमुख भागीदारांसोबत कामाचे समन्वय साधेल, अशी चर्चा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com