America: पारंपारिक पोषाख परिधान केल्याने १४ हिंदू महिलांवर हल्ला; माथेफिरु ताब्यात

आरोपीला होऊ शकते ६३ वर्षांची शिक्षा
America News
America Newsesakal

नवी दिल्लीः कॅलिफोर्निया येथे हिंदू महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. एका माथेफिरुने पारंपारिक पोषाख परिधान केलेल्या महिलांना लक्ष्य केलं.

वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल १४ हिंदू महिलांवर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीने महिलांना टार्गेट केल्याचं समोर आलेलं आहे. लॉथन जॉनसन (वय ३७) या व्यक्तीने दोन महिन्यांमध्ये १४ महिलांना टार्गेट केलं.

America News
Expensive Pink Diamond: 413 कोटींचा गुलाबी हिरा! हिऱ्याच्या विक्रीने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

पीडित महिलांनी एकतर साडी परिधान केली होती किंवा पारंपारिक दागिने परिधान केले होते. या माथेफिरु व्यक्तीने महिलांचे दागिनेही क्रूरपणे ओरबाडले. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरुय.

आरोपीने अनेक महिलांना मारहाणदेखील केल्याचे वृत्त 'एबीसी ७ न्यूज'ने दिलेय. हल्ला झालेल्या महिलांचं वय ५३ ते ७३ यामध्ये आहे. अधिक माहितीनुसार या आरोपीने मागे एकदा एका महिलेला धक्का दिला होता. शिवाय तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर दुखापत केली होती. नंतर महिलेचा हार हिसकावून तो फरार झाला.

आरोपी जॉनसनला सांता क्लारा पोलिसांनी आणि यूएस मार्शल कार्यालयाने अटक केली आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला जास्तीत जास्त ६३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आरोपीने चोरी केलेल्या दागिन्यांची किंमत साधारण ३५ हजार डॉलर इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com