अणूच्या केंद्रकात सापडला नवा 'गॉड पार्टिकल'?

C-Quark
C-Quark

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) : अणूच्या केंद्रकात आढळणाऱ्या नवीन मूलकणाचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. 'सी क्वार्क' नावाने ओळखल्या जाणाऱ्या चार मुलकणांपासून हा कण तयार झाला आहे. हिग्ज बोसॉन (गॉड पार्टिकल) चे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या जिनिव्हा येथील सर्नच्या प्रयोगशाळेतच या कणांचा शोध घेण्यात आला आहे. यामूळे 'क्वार्क्‍स'मध्ये असलेली स्ट्रॉंग न्युक्‍लिअर रिऍक्‍शन समजून घेण्यास मदत होणार आहे. 

'लार्ज हॅड्रॉन कोलायडर ब्युटी' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रवेगक प्रयोगशाळेत झालेले हे संशोधन 'आर्काईव्ह' शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. आजपर्यंत दोन किंवा तीनच्या गटाने क्वार्क्‍सच्या मूलकणांचे अस्तित्व दिसले होते. पण प्रथमच चारच्या गटाने क्वार्क्‍स एकत्र असलेला मूलकण शास्त्रज्ञांनी शोधला आहे. 

असे झाले संशोधन? 
- मूलकणांची प्रचंड वेगाने टक्कर घडविणाऱ्या लार्ज हॅड्रॉन कोलायडरचा वापर 
- २००९ ते २०१३ आणि २०१५ ते २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या टक्करींचे विश्‍लेषण 
- दोन चार्म क्वार्क आणि दोन अँटीचार्मक्वार्क असलेल्या कणांचे वस्तूमानाच्या आधारे अस्तित्वाची पुष्टी झाली 
- मॉल्यूक्‍यूलसारखी रचना असलेल्या या मूलकणाला "टेट्राक्वार्क' म्हणून ओळखले जाणार

संशोधनाचे वैशिष्ट्ये :
- चार वजनदार क्वार्क असलेला पहिला मुलकण 
- प्रोटॉन, न्यूट्रॉन, क्वार्क्‍स यांच्यातील स्ट्रॉंग न्यूक्‍लिअर रिऍक्‍शन समजून घेण्यास मदत होणार. 
- चार आणि पाच क्वार्क्‍स असलेल्या मुलकणांची सैद्धांतिक मांडणी (थेरॉटीकल) शास्त्रज्ञांनी केली आहे. 
- मूलभूत बले आणि अणूशास्त्रातील नवीन संशोधनावर प्रकाश पडेल. 

सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांनी टेट्रा क्वार्क्‍स संदर्भात मांडलेल्या सिद्धांतांना आता प्रत्यक्ष प्रयोगातून पुरावा मिळाला आहे. प्रेट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सचे गुणधर्म समजून घेण्यासाठी वजनदार असलेल्या चार क्वार्क्‍सचा हा मूलकण निश्‍चित मदत करेल. 
- ख्रिस पारक्‍स, प्रवक्ता, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, जिनिव्हा, स्वित्झर्लंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com