rick scott
rick scott

अमेरिकी सिनेटरला चीनचे पुरावे सादर करण्याचे आव्हान

Published on

बीजिंग - पाश्‍चिमात्य देशांत कोरोनावरील लस संशोधनासाठी सुरू असलेले प्रयत्न धीमे करण्याचा किंवा ते उधळून लावण्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकी सिनेटरला चीनने पुरावे मागितले आहेत. रिक स्कॉट यांनी हा आरोप केल्यानंतर चोवीस तास उलटण्याच्या आत चीनतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वॉशिंग्टनमध्ये रविवारी स्कॉट यांनी ‘बीबीसी टीव्ही’ला मुलाखत दिली. ते म्हणाले होते, की ‘‘आपण लस आधी विकसित करावी अशी चीनची इच्छा नाही, त्यामुळे अमेरिका तसेच माझ्यामते देशभरातील लोकशाहीसाठी शत्रू बनायचे चीनने ठरविले आहे.’’ त्यांना पुराव्यांचा तपशील मागण्यात आला, तेव्हा नकार दर्शवित ही माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाली, इतकेच त्यांनी सांगितले.

या संदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनयिंग यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले, की ते सिनेटर पुरावे असल्याचे म्हणत आहेत, तर कृपया त्यांनी ते सादर करावेत, त्यासाठी आढेवेढे घेण्याची गरज नाही.

कोरोना संसर्गाच्या माहितीबाबत चीनने कुचराई केल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केला आहे. ‘चिनी विषाणू’ असाही उल्लेख झाला. चीनने मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना वेळीच सुचित केल्याचा दावा केला आहे.

लस तयार करणे ही काही दोन देशांमधील स्पर्धा नाही. अमेरिकेने लस तयार केली तर तेसुद्धा चीनच्या प्रतिज्ञेचे अनुकरण करतील आणि ती साऱ्या जगाला मोफत उपलब्ध करतील अशी आम्हाला आशा आहे.
- हुआ चुनयिंग, चीनच्या परराष्ट्र प्रवक्‍त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com