ऐकावं ते नवलंच! पाकिस्तान अंतराळात काय पाठविणार पाहा!

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

सध्या पाकिस्तानमध्ये दूध आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. तेथे प्रतिलिटर दूधाचे दर हे पेट्रोलपेक्षा जास्त आहेत.

इस्लामाबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही जगातील अंतराळ क्षेत्रातील नामवंत संस्थांपैकी एक होय. भारताची 'चांद्रयान-2' ही मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी जगभरातील कोणत्याच देशाला पहिल्या प्रयत्नात जो कारनामा करता आला नाही, तो इस्रोने करून दाखविल्याने या मोहिमेचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही.

- #HowdyModi अमेरिकेत मोदी-ट्रम्प एकत्र भाषण करणार!

भारतीय वैज्ञानिकांच्या कष्टामुळे चांद्रयान-2 मोहिमेला जे यश मिळाले आहे, त्यामुळे जगभरातील तमाम अंतराळ प्रेमींनी इस्रोवर कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा जळफळाट झाला हे जगजाहीर आहे. आपल्या देशाकडून प्रेरणा घेत आता पाकिस्तान अंतराळ मोहिमेची आखणी करत असल्याची माहिती मिळाली आहे.   

आता पाकिस्तान 2022 पर्यंत मानवाला अंतराळात पाठविणार असल्याचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी रविवारी (ता.15) जाहीर केले. यासाठी चीनची मदत घेतली जाणार आहे. 

- इम्रान खान म्हणतात, भारताबरोबर युद्ध शक्‍य; व्यक्त केली 'ही' मोठी भीती

अंतराळवीरांची निवड प्रक्रिया 2020 मध्ये सुरू होणार आहे. चीनच्या सहकार्याने पाकिस्तान अंतराळ मोहीम आखणार आहे, असे फवाद यांनी सांगितल्याचे 'न्यूज इंटरनॅशनल'मधील वृत्तांत म्हटले आहे. या प्रक्रियेत प्रथम 50 व्यक्तींची निवड होणार आहे. 2022मध्ये त्यातून 25 जणांची निवड होईल आणि त्यातील एकाला अंतराळात जाण्याची संधी मिळेल.

अंतराळवीर निवड प्रक्रियेत पाकिस्तानच्या हवाई दलाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे फवाद यांनी म्हटले आहे. 1963 मध्ये अंतराळात यान पाठविणारा पाकिस्तान हा तत्कालीन सोव्हिएत रशियानंतर आशियातील दुसरा देश आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

- उदयनराजेंना उगीच घेतले का ? मुख्यमंत्री

सध्या पाकिस्तानमध्ये दूध आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. तेथे प्रतिलिटर दूधाचे दर हे पेट्रोलपेक्षा जास्त आहेत. तसेच अधूनमधून भारताची युद्ध करण्याची खुमखुमीही पाकला येत असते. 'खायला नाही दाणा अन् मला आमदार म्हणा',  अशी परिस्थिती असताना फवाद यांचा अंतराळात मानव पाठवण्याचा मनोदय हास्यास्पदच वाटत आहे.

- ‘बरं झालं माझ्या जातीला आरक्षण नाही’; नितीन गडकरींची भावना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chaudhry Fawad Hussain said that Pakistan will send humans into space by 2022