चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतावर केली टीका

India-and-China
India-and-China

बीजिंग - लष्करी चर्चेत झालेल्या समझोत्याचा भारतानेच भंग केला असल्याचा कांगावा आज चीनने केला आहे. भारताने सलग तीन दिवस चीनचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर चीनने आज भारतावरच आगपाखड केली आहे. चीनशी संबंधित ११८ ॲपवर बंदी घातण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावरही चीनने नाराजी व्यक्त केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आज पत्रकार परिषदेत भारतावर टीका केली. ‘चीनच्या संभाव्य हालचाली रोखल्या’ असा भारताने दावा केला आहे. म्हणजेच, भारताने नियंत्रण रेषेचे बेकायदा उल्लंघन केल्याचे सिद्ध होत आहे. त्यांनीच प्रथमच समझोत्याचा भंग केला आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. भारताने आपल्या जवानांवर नियंत्रण ठेवावे, चिथावणी देऊ नये आणि सीमारेषा ओलांडलेल्या जवानांना तातडीने परत बोलवावे, असे आवाहनही चीनने पत्रकार परिषदेत केले. भारताने मात्र चीनची घुसखोरी वेळीच उघड पाडत तसे प्रयत्नही उधळून लावले आहेत. सर्व मुद्दे शांततेच्या मार्गाने हाताळण्याचा आमचा निश्‍चय असल्याचेही भारताने आजही स्पष्ट केले आहे.  ॲपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयावरही चीनने आक्षेप नोंदविला. चिनी कंपन्यांवर बेकायदा बंदी घालत भारताने राष्ट्रीय सुरक्षेचा अवमान केला असल्याची टीका चीनने केली आहे.

लडाखमध्ये नरवणे
चीनबरोबरील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आज दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते सीमेवरील सुरक्षा स्थितीचा आणि भारताच्या युद्धसज्जतेचा आढावा घेणार आहेत. पँगाँग सरोवर परिसरात चीनने सलग तीन दिवस घुसखोरीचा प्रयत्न केल्याने सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया यांनीही पूर्वेकडील हवाई तळांना आज भेट दिली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com