भाजप खासदारांच्या कृतीने चीनला लागली मिर्ची; वाचा असं काय झालं...?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 मे 2020

तैवानचे राष्ट्रपती साई-इंग-वेन यांच्या शपथ ग्रहन सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्ववारे भाजपच्या खासदारांनी उपस्थिती लावली होती. मात्र, ही उपस्थिती चीनला चांगलीच झोंबल्याचं दिसत आहे. कारण चीन यावरुन भडकला असून लिखित स्वरुपात भारताकडे आक्षेप नोंदवला आहे. 

नवी दिल्ली- तैवानचे राष्ट्रपती साई-इंग-वेन यांच्या शपथ ग्रहन सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्ववारे भाजपच्या खासदारांनी उपस्थिती लावली होती. मात्र, ही उपस्थिती चीनला चांगलीच झोंबल्याचं दिसत आहे. कारण चीन यावरुन भडकला असून लिखित स्वरुपात भारताकडे आक्षेप नोंदवला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बुधवारी तैवानच्या राष्ट्रपतींचा शपथ ग्रहन सोहळा पार पडला. यावेळी दिल्लीतील भाजप खासदार मीनाक्षी लेखी आणि राजस्थानमधील चुरु येथील खासदार राहुल कासवान यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तसेच राष्ट्रपती साई-इंग-वेन यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावर चीनला मिर्ची लागल्याचं दिसत आहे. कारण आमच्या आंतरिक बाबींपासून दूर रहा असा इशारा चीनने दिला आहे.
----------
भाजपमध्ये धूसफूस; मागील महिन्याच्या राजकारणाचा पहिला बळी
----------
अभिमानास्पद ! युएनचा मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट पुरस्कार मेजर सुमन गावनी यांना जाहीर
----------
तैवानच्या राष्ट्रपतींच्या शपथ ग्रहन सोहळ्याला 41 देशातील 92 मान्यवरांनी व्हीडिओ कॉन्फर्सिंगद्ववारे उपस्थिती लावली होती. यात भाजपच्या दोन खासदारांसह अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांनी हजेरी होती. भारताची ही कृती चीनला पटल्याचं दिसत नाही. चीनने यावर लिखित स्वरुपात आक्षेप नोंदवला आहे. 

भारताने चीनच्या आंतरिक बाबींमध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच तैवानच्या राष्ट्रपतींना निवडीसाठी शुभेच्छा देणे चुकीचं असल्याचं दिल्लीस्थित चीनी दुतावासाचे काऊंन्सलर लिऊ बिंग यांनी म्हटलं आहे. एक चीन सिद्धांत आणि युएन चार्टर सर्वांना मान्य आहे. त्यामुळे तैवानला स्वतंत्र राष्ट्र मानत कार्यक्रमाला उपस्थिती लावणे योग्य नाही, असंही ते म्हणाले आहेत. 

खासदार राहुल कासवान यांनी चीनच्या आक्षेपावर उत्तर दिलं आहे. भारताची पूर्वीपासून जी भूमिका आहे त्यानुसारच आम्ही वागलो आहोत. त्यामुळे आम्ही काही गैर केलं असं आम्हाला वाटत नाही. तसेच चीन सत्त्याची मोडतोड करत आहे, असा आरोप कासवान यांनी केला आहे. 

दरम्यान, चीन भारताला सल्ला देत असला तरी चीनचे भारताबाबतचे आचरण सत्याला धरुन नाही. चीनने लडाख भागात खुसपटी काढणे सुरुच ठेवले आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिरमधून चीन आर्थिक कॉरिडॉर बनवत आहे. तसेच लडाखला भारताचा केंद्रशासीत प्रदेश मानायलाही चीनची तयारी नाही. त्यामुळे भारताच्या आंतरिक बाबींमध्ये लक्ष देणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chin got angry due to bjp mp attend taiwan president outh ceremony