होय! चीनने WHO ला फसवलं, कौतुक व्हावं म्हणून केलं 'हे' कृत्य

covid 19
covid 19

जीनिव्हा, ता. २ (एपी) : कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) चीनचे वारंवार आणि भरभरून कौतुक केले असले तरी वास्तविक चीनने या संघटनेला अंधारात ठेवल्याचा दावा 'असोसिएटेड प्रेस-एपी'ने केला आहे. कोरोना विषाणूचे स्वरूप जाणून त्यावर लस निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेला जनुकीय नकाशा चीनने एक आठवडा दाबून ठेवला आणि ययाबाबतच्या आवश्यक चाचण्या, औषधे यांची माहितीही चीनने जगाला दिली नाही, असा आरोप आहे. 
चीनमधून माहिती बाहेर जाण्यावर असलेले कडक निर्बंध आणि चीनच्या आरोग्य यंत्रणेतील कुरघोडीचे राजकारण यामुळेच जगाला कोरोनाबाबत उशीरा माहिती मिळून संसर्ग पसरल्याचे 'एपी'ने गोपनीय कागदपत्रे, ई-मेल आणि अनेक मुलाखतींच्या हवाल्याने म्हटले आहे. चीनमधील एका प्रयोगशाळेने ११ जानेवारीला आरोग्य मंत्रालयाच्या आधीच जनुकीय नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर मग अधिकृतपणे तोच नकाशा जाहीर केला गेला. यानंतरही जागतिक आरोग्य संघटनेला हवी असलेली माहिती देण्यास चीनने दोन आठवडे लावले. 

जागतिक आरोग्य संघटनेने चीनचे अनेकदा जाहीर कौतुक केले असले तरी हा देश योग्य माहिती पुरवीत नसल्याची नाराजी आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा व्यक्त केल्याचे संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या अनेक बैठकांच्या नोंदींवरून दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत असल्याचा अनेकदा आरोप करत अमेरिकेने नुकतेच या संघटनेशी संबंध तोडून टाकला आहे. या पार्श्वभूमीवर ही माहिती उजेडात आली आहे. 

चीनने कोरोनाबाबतची बरीचशी माहिती जगासमोर ऐनवेळी आणली. दरम्यान संभाव्य धोके आणि माहिती त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही चीनवर झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला माहिती देतानाही त्यात सर्व काही सांगण्याऐवजी मोजकीच माहिती देण्यात आली. 

चीनकडून माहिती काढून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अनेकदा कौतुकाचा वर्षावही केला. कोरोना विषाणूचा जनुकीय नकाशा 2 जानेवारीला तयार झाला. त्यानंतर 3 जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेनं महामारी जाहीर केली. याकाळात कोरोनाचा जगभर संसर्ग पसरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com