चीनमध्ये तयार झाला नवा व्हायरस, जगासाठी किती धोकादायक?

corona
corona

बिजिंग - चीनमधून जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस अजुन नियंत्रणात आलेला नाही. कोरोनामुळे जगात आतापर्यंत 5 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 1 कोटी लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनही केलं. तरीही कोरोनाने हाहाकार माजवला. यामुळे जगावर आर्थिक संकटही ओढावलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू असताना आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे. चीनमध्ये सापडलेल्या नव्या व्हायरसने लोकांची चिंता अजुन वाढवली आहे. संशोधकांनी म्हटलं की, हा व्हायरस पसरण्याची शक्यता जास्त आहे. फ्लूवर सध्या उपलब्ध असलेलं वॅक्सिन या व्हायरसला रोखण्यासाठी सक्षम नाही. डुक्करांमध्ये सापडलेला हा व्हायरस माणसांना लागण होऊ शकते. 

संशोधकांनी या व्हायरसला G4 EA H1N1 असं नाव दिलं आहे. संशोधकांना भीती आहे की हा व्हायरस सहजपणे एका माणसापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकते. जगासाठी ही काळजीची गोष्ट आहे की एन्फ्लुएंझाचा हा नवा व्हायरस त्या आजारांमध्ये समाविष्ट आहे ज्यावर तज्ज्ञ लोक नजर ठेवून आहेत. त्यातही सध्या कोरोनाचे संकट असतानाच आता नव्या व्हायरसनं दार ठोठावलं आहे. 

G4 EA H1N1 पूर्ण जगामध्ये साथीचा धोका निर्माण करू शकतो. चीनी संशोधकांनी सांगितलं की, या फ्लू व्हायरसमध्ये सर्व लक्षणं आहेत जी माणसांमध्ये संक्रमित होऊ शकतात. या व्हायरसचे परीक्षण करण्याची गरज आहे. हा व्हायरस नवा आहे आणि लोकांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असेल किंवा नसेल. 

कोरोना व्हायरसच्या आधी जगात शेवटची साथ फ्लूची 2009 मध्ये आली होती. तेव्हा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. मेक्सिकोतून सुरु झालेला स्वाइन फ्लू तेवढा धोकादायक नव्हता जितका अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे जगात एक कोटींहून अधिक लोक बाधित झाले आहेत. अशा परिस्थितीत जर हा नवा व्हायरस पसरला तर तो रोखणं कठीण होईल. 

नवीन व्हायरस G4 EA H1N1 मध्ये त्याच्या पेशींची आतल्या आत वाढ करण्याची क्षमता आहे. संशोधकांना चीनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागली. फ्लूवर उपलब्ध असलेली औषधे यावर लागू पडण्याची शक्यता कमी आहे. प्रोफेसर किन चो चांग यांनी सांगितलं की, कोरोनाच्या संकटात सध्या आपण आहोत. पण आम्ही आता संभाव्य धोकादायक व्हायरसवरून नजर हटवू शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com