Road Accident : चीनच्या जिआंगशी प्रांतात भीषण अपघात; 17 ठार, 22 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Road Accident

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे.

Road Accident : चीनच्या जिआंगशी प्रांतात भीषण अपघात; 17 ठार, 22 जण जखमी

बीजिंग : चीनच्या जिआंगशी (China Jiangxi) प्रांतातील नानचांग काउंटीमध्ये आज (रविवार) झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) 17 जण ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीये.

हेही वाचा: Love Jihad : आमच्याशी लग्न करून मुस्लिम व्हा, नाहीतर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही; हिंदू मुलींना धमकी

सीजीटीएननं सांगितलं की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे. नानचांग काउंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार, पहाटे 1 वाजण्याच्या आधी हा अपघात घडला. सध्या या अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही.'

हेही वाचा: Air India Urination Case : ..तर 'ही' घटना टाळता आली असती; Air India च्या सीईओंचं मोठं वक्तव्य

चीनमध्ये कडक सुरक्षा नियंत्रण नसल्यामुळं रस्ते अपघात होताहेत. गेल्या महिन्यात धुक्यामुळं शेकडो वाहनं एकमेकांवर आदळली. यात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तर, सप्टेंबरमध्ये नैऋत्य चीनच्या गुइझोउ प्रांतात एका मोटरवेवर बस उलटून 27 प्रवासी ठार झाले होते.