esakal | पृथ्वीकडे उरले आहेत, 7 वर्षे, 101 दिवस!
sakal

बोलून बातमी शोधा

Climate Clock

आता आपल्याकडे 7 वर्षे, 101 दिवस, 17 तास, 29 मिनिट आणि 22 सेकंद उरले आहेत.

पृथ्वीकडे उरले आहेत, 7 वर्षे, 101 दिवस!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर...? पृथ्वीचं आयुष्य निर्धारीत होऊन तिच्या समाप्तीचं वय जर आपल्याला कळालं तर काय होईल बरं? असा कधी तुम्ही विचार केला आहे का? माणसांचं आणि इतर अनेक वन्यजीवांचं जगणं कधी संकटात येणारे हे सांगणारं एखादं घड्याळच तयार झालं तर...? ज्या घड्याळाची सतत होणारी टिकटिक आपल्याला जाणीव करुन देत राहिल की आपल्याकडे आता इतकाच वेळ शिल्लक राहिला आहे... ही काही परीकल्पना नव्हे तर अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असं एक घड्याळ बनवलं गेलं आहे. 

काय आहे हे घड्याळ?
या घड्याळाला म्हणतात अॅस्ट्रॉनॉमिकल डिजीटल क्लॉक. खरं तर वातावरणात अमुलाग्र असे बदल घडत आहेत. सध्या अनेकजण याबाबत अत्यंत निष्काळजी असले तरीही  बदलणाऱ्या वातावरणाने धोक्याची घंटा मात्र वाजवली आहे. आणि आता हे घड्याळच आपल्याला सांगणार आहे की जगाकडे किती वेळ आणखी शिल्लक राहिला आहे. 

हेही वाचा - एका संशोधनानुसार अधिक घातक असू शकतं दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह येणं​
किती काळ आपल्याकडे शिल्लक आहे?
या घड्याळाला दोन कलाकारांनी एकत्र येऊन बनवलं आहे. गँन गोलन आणि अँड्रयू बॉयड असं त्या दोघांचं नाव आहे. त्यांनी हे घड्याळ बनवून एकप्रकारे जगाला हवामान बदलांबाबतचा इशाराच दिला आहे. या घड्याळातून त्यांनी जगाला सांगितलं आहे की, आता आपल्याकडे 7 वर्षे, 101 दिवस, 17 तास, 29 मिनिट आणि 22 सेकंद उरले आहेत. हा उर्वरित वेळ आपल्याला सांगतो की जगात या एवढ्या वेळात कार्बनची मात्रा पुरेशा प्रमाणात वाढेल. आणि ही वाढलेली मात्रा इतपत नक्कीच असेल की ती आटोक्यात आणणे माणसाला अवघड होऊन बसेल. 

तर काय होईल?
कार्बनची वाढलेली ही मात्रा मोठी नुकसानकारक ठरणार आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार जगात पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात महापूर येतील. जंगलांमध्ये वणवे पेटतील, दुष्काळ येतील आणि लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण होईल. पृथ्वीचे कार्बन बजेट कमी होईल. तापमान 1.5 डिग्री सेल्सियसने वाढेल. आणि हे तापमान इतके वाढेल की पाण्याचे दुर्भिक्ष्य येईल. 2019 मध्ये नासाने या आमुलाग्र हवामान बदलांबाबत लोकांना अवगत केले होते. 

हेही वाचा - Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

घड्याळ निर्मात्यांचं काय म्हणणं आहे?
मिस्टर गोलन यांनी म्हटलं की, आपल्याकडे इतकाच वेळ शिल्लक उरला आहे, हे छतावर चढून सांगणे, ही आमची स्टाईल आहे. या प्रोजेक्टला त्यांनी क्यायमेट क्लॉक असं नाव दिलं आहे. याबाबत मिस्टर बॉयड म्हणतात की, जगासाठी हे आकडे खूप गरजेचे आहेत. हे घड्याळ 14 स्ट्रीट बिल्डींग, वन युनियन स्कॉवायर साउथ मध्ये लावलं आहे. 

एकप्रकारे, या घड्याळाची टिकटिक आपल्याला सतत इशारा देत राहणार आहे. हवामानात अमुलाग्र बदल होऊ नयेत, म्हणून आतातरी काही करा, असंच हे घड्याळ सातत्याने सांगत राहणार आहे, यात शंका नाही. 
 

loading image
go to top