
या छायाचित्रामुळे पाकिस्तानच्या न्याय यंत्रणेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. उत्तरदायित्वावर जनतेने किती विश्वास ठेवावा हे सुद्धा यातून स्पष्ट होते.
- फवाद चौधरी, विज्ञान मंत्री
शरीफ न्यायालयात खोटे बोलून परदेशी गेले. लोक मुर्ख आहेत असे त्यांना वाटते. त्यांनी परत येऊन सुनावणीला सामोरे जावे.
- शाहबाझ गील, पंतप्रधानांचे सल्लागार
लाहोर - माजी पंतप्रधान नवाझ शरीफ लंडनमधील रस्त्यालगतच्या कॅफेमध्ये आपल्या नातींबरोबर चहा पीत असल्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलचा वाद आणखी चिघळला. शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरील सुनावणीसाठी मायदेशी परत आणावे अशी मागणी सत्ताधारी तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या मंत्री आणि सदस्यांनी केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
हे छायाचित्र अगदी अलिकडचे असावे. शरीफ यांनी निळ्या रंगाची सलवार कमीज घातली असून डोक्यावर टोपी आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे त्यावरून वाटते. शरीफ ७० वर्षांचे असून तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी गेल्या वर्षी त्यांनी लाहोर उच्च न्यायालयाकडून परदेशी जाण्याची परवानगी मिळविली होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना चार आठवड्यांसाठी परदेशी जाण्याची मुभा मिळाली. त्या मुदतीत किंवा प्रवास करण्याइतपत प्रकृती चांगली झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच आपण मायदेशी परत येऊन आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊ असे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले होते. त्यांना ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांचा गुंतागुंतीचा आजार झाल्याचे निदान सत्ताधारी पक्षाच्या डॉक्टरांच्या पॅनेलने केले होते.
चीनच्या कुरापतीदरम्यान 'बलशाही भारत'चे दर्शन!, ही आहे भारताची ताकद
त्यानंतरच त्यांना परदेशी उपचारासाठी पाठवावे असा सल्लाही या पॅनेललने दिला होता. लंडनमधील रुग्णालयात त्यांच्या आजाराचे सखोल निदान झाले. शस्त्रक्रिया मात्र कोरोनामुळे लांबणीवर पडल्याची माहिती त्यांच्या मुलीने अलिकडेच दिली होती.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदी म्हणाले, ''सोबत बसून समोसा खाऊ!''