ऑक्‍सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या कोरोना लशीला मोठं यश; वृद्धांवरही ठरतेय प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

सुरुवातीपासून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका कोरोना व्हॅक्सिनच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आता कंपनीच्या ट्रायलमध्ये व्हॅक्सिन वृद्धांवरही प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. 

लंडन - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात व्हॅक्सिनच्या संशोधनाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये एस्ट्राजेनेकाला मोठं यश मिळालं आहे. सुरुवातीपासून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका कोरोना व्हॅक्सिनच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आता कंपनीच्या ट्रायलमध्ये  व्हॅक्सिन वृद्धांवरही प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, व्हॅक्सिनमुळे वृद्धांच्या शरिरात प्रोटेक्टिव्ह अँटिबॉडीज आणि टी सेल्सची निर्मिती झाली. यात रिसर्चशी संबंधित दोन अज्ञात लोकांचा हवाला देण्यात आल आहे. 

एस्ट्राजेनेकाने ही व्हॅक्सिन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्ससोबत मिळूतन तयार केली आहे. या व्हॅक्सिनची भारतातही अॅडव्हान्स ट्रायल सुरू आहे. व्हॅक्सिनला कोविशिल्ड असं नाव देण्यात आलं असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एस्ट्राजेनेकासोबत याच्या 100 कोटी डोसचा करार केला आहे.

हे वाचा - 'लस राष्ट्रवादा'वरुन WHO चा गंभीर इशारा; सर्व देशांना केले आवाहन

जुलै महिन्यात ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनचा इम्युनॉजेनिसिटीचा डेटा प्रसिद्ध केला होता. जुलै महिन्यात जे रिझल्ट आले होते तसेच आताच्या ब्लड टेस्टचे रिझल्ट आले आहेत. जुलैमध्ये कोरोना व्हॅक्सिन 18 ते 55 वयाच्या व्हॉलंटिअर्सना टोचण्यात आलं होतं. त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता तयार झाली होती. 

दरम्यान, एस्ट्राजेनेकाने सप्टेंबर महिन्यात त्यांच्या व्हॅक्सिनची ट्रायल थांबवली होती. ब्रिटनमध्ये लस टोचण्यात आलेली एक व्यक्ती आजारी पडली होती. मात्र नंतर अमेरिका वगळता सर्वत्र पुन्हा ट्रायल सुरू करण्यात आल्या. शुक्रवारी अमेरिकेनं एस्ट्राजेनेकाला पुन्हा एकदा व्हॅक्सिनच्या ट्रायलला परवानगी दिली आहे. 

हे वाचा - मुकेश अंबानी vs जेफ बेजोस; 25 हजार कोटींच्या करारासाठी दोन अब्जाधीशांची टक्कर

ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका यांची लस सध्या जगात आघाडीवर आहे. तसंच या व्हॅक्सिनच्या निर्मिती प्रक्रियेत काळजी घेऊन ट्रायल्स घेतल्या जात आहेत. तसंच ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात आहे. जगातील अनेक देशांनी एस्ट्राजेनेकाच्या लशीसाठी कोट्यवधी डोसचा करार केला आहे. पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये व्हॅक्सिन बाजारात उपलब्ध होईल अशी आशा आहे. सध्या फायजर, मॉडर्ना याशिवाय चीनच्या पाच व्हॅक्सिन अॅडव्हान्स ट्रायल्समध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine oxford astrazeneca covishield effective on old people