अमेरिकेत कोरोनाचा रेकॉर्डब्रेक! एका दिवसात सापडले 80 हजार नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एका दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूने आतापर्यंतंचे सर्व विक्रम मोडले आहेत आणि एका दिवसात तब्बल 80 हजार नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत शुक्रवारी एका दिवसात सुमारे 80 हजार रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी रात्री 8.30 पासून ते शुक्रवारी रात्री 8.30 पर्यंत अमेरिकेत कोरोनाचे 79,963 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एका दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नेमके त्याचवेळी रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 

हेही वाचा- चीनला वेसण घालण्यासाठी भारतासारखा सहकारी आवश्यक- अमेरिका

दुसरीकडे जगात इतर ठिकाणीही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जगातील कोरोना बाधितांची संख्या 4.17 कोटींहून अधिक झाली आहे. यामुळे सुमारे 11.37 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- कलम ३७० येईपर्यंत दुसरा झेंडा घेणार नाही; मेहबुबा मुफ्ती यांचे वादग्रस्त विधान

तर अमेरिकेत यामुळे 2.23 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधितांची संख्या 85 लाखांच्या वर गेली आहे. भारतात मागील 24 तासांत 54,366 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. भारतातील रुग्णसंख्या 77,61,312 पर्यंत पोहोचली आहे. याच कालावधीत 73,979 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 69,48,497 झाली आहे. 

हेही वाचा- चिराग पासवान यांच्यामागे पी.के यांची बुद्धी!

ब्राझीलमध्ये कोरोनाची लागणा झालेल्यांची संख्या 53.23 लाख झाली आहे. तर सुमारे 1.55 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रशियातही कोरोनाबाधितांचा आकडा 14.53 लाखांहून अधिक झाला आहे. तर 25,072 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas record break in America! 80000 new patients were found in one day