कोरोनाजन्य परिस्थितीत ब्रिटनच्या महाराणींचा हा रुबाब ठरतोय चर्चेचा विषय

coronavirus, britain queen, elizabeth ii
coronavirus, britain queen, elizabeth ii

लंडन : जगभरात कोरोना विषाणूमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र युद्धपातळीवर पर्यत्न करत आहे. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी अनेक राष्ट्रांनी देशव्यापी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. ब्रिटनही याला अपवाद नाही. लॉकडाउनमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेता अनेक राष्ट्रात लॉकडाउनमध्ये शिथीलता देऊन जन-जीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ब्रिटनमध्ये लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्यानंतर 94 वर्षीय महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी चक्क घोडेस्वारी केल्याचे पाहायला मिळाले. कोरोना विषाणूमुळे दहशतीच्या वातावरण निर्माण झाले असताना महाराणी एलिझाबेथ यांनी उतार वयात दाखवलेल्या सकारात्मकतेची जगभरात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराणींचा घोडेस्वारी करतानाचा फोटो व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

ब्रिटनमधील कोरोनाच्या थैमानानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मागील 10 आठवडे स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते. यापूर्वी महाराणी प्रत्येक दिवशी घोडेस्वारी करत असल्याची चर्चाही रंगली होती. लॉकडाउनमुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले असताना राणी एलिझाबेथ यांनी घोडेस्वारीचा आपला छंद जपत एक प्रकारचा सकारात्मक संदेश दिला आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने ब्रिटनलाही मोठ्या प्रमाणात प्रभावित केले आहे.

ब्रिटनमधील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती घालवण्यासाठी यापूर्वी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी देशवासियांना संबोधित केले होते. जागतिक महासाथीच्या रोगाच्या महामारीतून सावरुन आपण पुन्हा उभे राहू, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला होता. 67 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी पाचव्यांदा देशवासियांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते.  ब्रिटनमध्ये  2,74,762 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत याठिकाणी जवळपास 38,489 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com