
लंडन : कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रादुर्भावामुळे जगभरातील राष्ट्रे मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. जागतिक महासाथीच्या रोगाची नवी लक्षणं समोर येत असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवताना विकसनशील राष्ट्रेही हतबल झाल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे श्वसन आणि ह्रदय विकाराचा झटका यासह मेंदूघात (ब्रेन स्ट्रोक) चा धोका संभवू शकतो, असे ब्रिटनच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. जीवघेणा विषाणू व्यक्तीच्या शरिरात खूप वेळ राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो. त्यांना भविष्यात कोरोनाच्या लक्षणाशिवाय अन्य काही अजारांचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील डॉक्टरांनी केलेल्या अध्ययनानुसार, 30 दिवसानंतरही कोरोनाची लक्षणं दिसू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही हे समजण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे, असे जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला संशयीत व्यक्ती किंवा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून आलेल्या व्यक्तींना 14 दिवस क्वारंटाइन केले जाते.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, लंडनमधील एका महिलेला खोकला आणि ताप ही लक्षणं आढळल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केला. यानंतर तब्बल 9 आठवड्यानंतर संबंधित महिलेला ह्रदय विकाराची समस्या उद्भभवली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर निकोलस हार्ट यांनी देखील कोरोनाची लागण झालेल्या अन्य समस्याही त्रस्त करु शकतात असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, कोरोना विषाणू हा पुढील पिढीसाठी पोलिओसारखी समस्या निर्माण करु शकतो. खूप काळ आपल्याला या संकटाचा सामना करण्याची वेळही येऊ शकते.
कोरोना विषाणूची (coronavirus) लागण झाल्याने ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास 31,855 लोकांनी आपला जीव गमावला आहे. जगभरात 2,83,860 लोकांचा मृत्यू झालाय. जगभरातील जवळपास 14,90,776 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र ब्रिटनच्या नागरिकांनी अन्य आजार सावरणाऱ्यांना भविष्यात त्रासदायक ठरु शकतात, असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.