esakal | चीनच्या अडचणी वाढल्या; कोरोनाप्रकरणी गांभीर्याने तपास सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Trump

कोरोनाच्या प्रसाराला चीनच कारणीभूत असल्याचा अमेरिकेचा दावा असून त्याबाबत अत्यंत गांभीर्याने तपास सुरु असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. तसेच, जर्मनीने नुकसानभरपाई म्हणून चीनकडे मागितलेल्या पैशांहून अधिक पैसे अमेरिका मागणार आहे, असे ट्रम्प यांनी सूचित केले.

चीनच्या अडचणी वाढल्या; कोरोनाप्रकरणी गांभीर्याने तपास सुरू

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन Coronavirus - कोरोनाच्या प्रसाराला चीनच कारणीभूत असल्याचा अमेरिकेचा दावा असून त्याबाबत अत्यंत गांभीर्याने तपास सुरु असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. तसेच, जर्मनीने नुकसानभरपाई म्हणून चीनकडे मागितलेल्या पैशांहून अधिक पैसे अमेरिका मागणार आहे, असे ट्रम्प यांनी सूचित केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘व्हाइट हाऊस’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ट्रम्प यांनी माहिती दिली. कोरोनामुळे जगभरात दोन लाखांहून अधिक नागरिकांचा बळी गेला असून त्यातील एक चतुर्थांश एकट्या अमेरिकेतील आहेत. कोरोनाच्या प्रसारावरून अमेरिका आणि चीन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. चीनने योग्य वेळी माहिती दिली असती तर आतापर्यंत झालेले आणि अजूनही होत असलेले मानवी आणि वित्तीय नुकसान टाळता आले असते, असे अमेरिका आणि जर्मनीसह युरोपातील बहुतेक देशांचा दावा आहे.

Coronavirus : पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही

यामुळेच ते चीनकडून नुकसान भरपाई मागण्याची भाषा करत असून जर्मनी १३० अब्ज डॉलरची मागणी करणार आहे. अमेरिकाही असेच करणार का, असे पत्रकारांनी विचारले असता ट्रम्प म्हणाले की, अमेरिका सरकार अधिक सोप्या पद्धतीने वसूली करणार आहे. नुकसानभरपाईची रक्कम आम्ही अद्याप निश्‍चित केली नाही, पण ती जर्मनीपेक्षा खूप अधिक असेल. चीनविरोधात गांभीर्याने तपास सुरु असून त्याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.

कोरोनाला हरवून जॉन्सन पुन्हा कार्यालयात हजर

‘किम यांच्या प्रकृतीबाबत माहिती आहे’ 
उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र, ‘किम यांच्या प्रकृती कशी आहे, याबाबत मला निश्‍चित माहिती आहे,’ असा दावा केला. मात्र, हे सांगतानाच ‘ती माहिती मी तुम्हाला देणार नाही’, असेही सांगितले. ते लवकर बरे व्हावेत, एवढेच मी म्हणेन, असे ट्रम्प म्हणाले.

loading image
go to top