चीन 'डॅमेज कंट्रोल' करतंय की राजकारण? 

coronavirus china helping European countries medical equipment
coronavirus china helping European countries medical equipment

Coronavirus:कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार केल्यानंतर, आता त्याला जबाबदार कोण? यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  जगभरातून यासाठी चीनकडंच बोट दाखवलं जातंय. विशेषतः अमेरिकेनं कोरोना व्हायरसचा उल्लेख चीनी व्हायरस किंवा वुहान व्हायरस असा केला. त्यामुळं जगभरात चीनची प्रतिमा डागाळलीय. ता आता ही प्रतिमा सुधारण्याचं आव्हान चीनपुढं आहे. पण, प्रतिमा डागाळलेला चीन इतर देशांच्या मदतीला धावून जातोय. अर्थात या मदतीकडंही संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय.

स्पेनला दिला धीर
कोरोनाचं आव्हान असणाऱ्या युरोपमधील स्पेनला चीननं 432 मिलियन युरोची औषधं आणि इतर साहित्य विकलं. दोन दिवसांपूर्वीच्या या बातमीनं जगभरात चीनविषयी वेगळी चर्चा सुरू झालीय. मुळात कोरोना व्हायरस चीनमधून जगभर पसरल्यामुळं चीन पहिल्यापासूनच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. अमेरिकेनं थेट चीनला यासाठी दोषी ठरवलं असलं तरी, चीनकडं सहानुभूतीनं बघणारे देशही आहेत. अर्थात त्यांचे चीनशी असणारे आर्थिक संबंध त्याला कारणीभूत आहेत. आता या सगळ्यामागे चीनची व्यापार वृत्ती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. अगदी या व्यापार उद्देशासाठी चीनने कोरोना व्हायरसची निर्मिती केल्याचा आरोपही होत आहे. पण, या आरोपांमागे कोणतेही तथ्य नाही. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. वादळानंतर कायम, सूर्य किरणं येतात, असं म्हणत चीन आणि स्पेन यांनी कोरोनाशी लढा देताना परस्पर सहकार्य केलं पाहिजे, असंही जिनपिंग म्हणाले आहेत. 

चीनने कोणाला मदत केली?

  • फ्रान्स
  • इटली
  • स्पेन 
  • फिलिपिन्स
  • इराण 
  • इराक 

चीन वाजवतोय स्वतःचा ढोल
चीनने कोरोनावर विजय मिळवलाय हे एव्हाना जगाला माहिती झालंय. पण, हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चीन सरसावला आहे. फेब्रुवारी महिन्यात चीनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखाच्या घरात होती. पण, सध्या हा आकडा 80 हजारांच्या घरात असून, मृतांची संख्या केवळ 3 हजारपर्यंत मर्यादीत राहिली आहे. या उलट इटली, स्पेन, अमेरिकेत मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. यासंदर्भात ऑस्ट्रेलियातील लॉय इन्स्टिट्यूटमधील संशोधक नाताशा कास्सम यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे की चीनचा मीडिया पुन्हा इतिहास लिहिण्याच्या तयारीत आहे. त्यामुळचं त्यांनी कोरोनावरील विजयाचा जगभरात ढोल वाजवायला सुरुवात केलीय. 

चीन तयार करतोय वातावरण
व्यापार युद्धाच्या निमित्तानं चीन आणि अमेरिका एकमेकांच्या समोर उभे आहेत. त्यात कोरोनामुळं परिस्थिती आणखी बिघडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा उल्लेख चायनीज व्हायरस असा केला. पण, चीनने त्याला प्रत्युत्तर दिले नाही. दरम्यान, शी जिनपिंग यांच्याशी कोरोना संदर्भात चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय. पण, दोन्ही देशांमध्ये मतभेदांची दरी तशीच राहणार आहे. किंबहुना ती वाढणार आहे. एका बाजुला चीन युरोपमधील देशांना मदत करत आहे. तर अमेरिकेनं सुरुवातीला युरोपमध्ये प्रवास करण्यावर बंदी घालून नाराजी ओढवून घेतली होती. चीन युरोपीय देशांना मदत करतोय यात काहीच गैर नाही, असं मत जर्मन मार्शल फंडचे वरिष्ठ अधिकारी नोह बार्किन यांनी म्हटलंय. युरोपी देशांना मदत करून, जागतिक पातळीवर चीन आपल्याबाजूनं वातावरण तयार करतोय, असंही बार्किन यांचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com