Coronavirus:जपानमध्ये जहाजावर कोरोनाची लागण; 168 भारतीय अडकले

coronavirus diamond princess ship japan 168 indian embassy
coronavirus diamond princess ship japan 168 indian embassy

टोकिओ Coronavirus : जपानमधील डायमंड प्रिसेस क्रूझवर कोरोना विषाणू संसर्गाने हल्ला केल्याचे उघड झाले आहे. या क्रुझमध्ये तीन हजार प्रवासी असून, त्यापैकी ६० जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले. जहाजावरील एकूण १३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय आहे.

गेल्या आठवड्यात ३ हजार ७११ प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज जपानच्या किनाऱ्यावर पोचले होते. हॉंगकॉंग येथे या जहाजातील प्रवासी उतरणार होते, मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने जपानने या जहाजावरून प्रवाशांना उतरण्यास मनाई केली. त्याचवेळी क्रूझ डायमंड प्रिन्सेसला वेगळे ठेवण्यात आले. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून हजारो नागरिक जहाजावर अडकून पडले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असून जहाजावरील सर्व प्रवासी भयभीत झाले आहेत. या जहाजात भारतीय प्रवासी देखील आहेत. त्यात क्रू मेंबर अधिक आहेत. 

भारतीयांना सूचना
यासंदर्भात भारतीय दूतावासाने ट्विटरवर म्हटले की, जहाजावर अडकलेल्या नागरिकांविषयी माहिती घेण्यासाठी दूतावासाच्या सचिवाशी संपर्क साधता येईल. जहाजात अडकलेल्या प्रवाशांना मास्क घालण्याची सूचना दिली असून, इतरापासून वेगळे राहण्यास सांगितले आहे. जहाजावरील प्रवासी अनंत अडचणींचा सामना करत आहेत. कारण प्रवासी ज्या कॅबिनमध्ये आहेत, तेथे खिडक्या नाहीत. संसर्ग झालेल्या प्रवाशांवर तातडीने उपाय करणे गरजेचे आहे. 

'भारतीयांना लागण नाही'
दरम्यान, सुर्देवाने एकाही भारतीय नागरिकास कोरोनाची बाधा झाली नसल्याचे पररष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ट्विट करून सांगितले. विनयकुमार सरकार या भारतीय प्रवाशाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, या जहाजावर १६० भारतीय क्रू मेंबर असून ८ प्रवासी भारतीय आहेत. यावेळी सरकार यांनी भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. आतापर्यंत कोणीही आपल्याला तपासले नसल्याचे म्हटले आहे. सरकार हे बंगालचे असून ते शेफ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने हालचाली कराव्यात असे सरकार यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com