ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या अवताराने भरली धडकी; जाणून घ्या परिस्थिती!

Corona
Corona

कोरोना व्हायरसवर लस तयार झाली असून, अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवातही होत आहे. भारतातही लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. अशातच ब्रिटनमधील एका बातमीने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळला असून, हा प्रकार अधिक घातक असल्याचे तेथील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या संदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. 

जगात काय घडतंय?

  • ब्रिटनमधून येणारी हवाई सेवा बंद; जगभरातील देशांनी घेतला निर्णय 
  • सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे, जल वाहतूक आठवड्यासाठी केली बंद
  • नव्या व्हायरस संदर्भात माहिती मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंद वाढवणार - सौदी अरेबिया
  • कोरोनाचा नवा प्रकार, ब्रिटनसह इटली, नेदरलँड, डेन्मार्कसह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेतही पसरला

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रिटनमध्ये काय घडतंय?
ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चौथ्या टप्प्यातील कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लंडनसह देशातील इतर शहरांमध्ये या लॉकडाऊनची नियमावली पाळावी लागणार आहे. कोरोनाचा नवा प्रकार समोर येण्यापूर्वी ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या काळात कोरोनाच्या नियमावलीत शिथीलता देण्याची घोषणा ब्रिटन सरकारने केली होती. परंतु, गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोना व्हायरसच्या प्रकाराने भितीच्या छायेत असलेल्या ब्रिटनमध्ये ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन होणार नसल्याचे दिसत आहे. शेवटच्या आठवड्यात नियमांमध्ये शिथीलता देण्याची घोषणा बोरीस जॉन्सन यांच्या सरकारने मागे घेतला आहे.

व्हायरसविषयी अजूनही शंका?
ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरस प्रकाराविषयी अद्याप कोणतिही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या व्हायरसने संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं असलं तरी, शास्त्रज्ञ अद्याप सावध भूमिकेत आहेत. या संदर्भात अमेरिकेतील भारतीय वंशांचे डॉ. विवेक मूर्ती यांनी शंका उपस्थित केली आहे. नवा व्हायरस अधिक घातक असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा अद्याप मिळालेला नाही, असं मत डॉ. मूर्ती यांनी उपस्थित केलंय. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी डॉ. मूर्ती यांची नियुक्ती सर्जन जनरलपदी केली आहे. त्यामुळे डॉ. मूर्ती यांच्या मताला विशेष महत्त्व आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com