esakal | न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील 'वुहान' होण्याची शक्यता; एका दिवसात हजार बळी 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus usa update new york maximum deaths within 24 hours

एक दिवसात न्यूयॉर्कमधील मृतांची संख्या 237 वरून 728 आणि 965 पर्यंत पोहोचली आहे.

न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील 'वुहान' होण्याची शक्यता; एका दिवसात हजार बळी 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

न्यूयॉर्क Coronavirus:कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जग अक्षरशः हतबल झालंय. एकट्या युरोपमध्ये जवळपास 25 हजार जणांचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. आता युरोपनंतर सर्वांत मोठा धोका आता अमेरिकेला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढं गेलीय. सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला असून, न्यूयॉर्क हे अमेरिकेतील वुहान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडलं न्यूयॉर्कमध्ये
चीनच्या वुहान शहरात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले. हुबेई प्रांतातील हे वुहान शहर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये वुहान शहर हे कोरोनाचे जगातील केंद्र बनले होते. संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. तसच चीन सरकारनं हुबेई प्रांतालाच जगापासून तोडलं होतं. आता चीन सावरला असला तरी, वुहानसारखी परिस्थिती न्यूयॉर्कमध्ये उभी राहण्याचा धोका आहे. सध्या अमेरिकेतील सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्क शहरात आहेत. रुग्णांच्या संख्येपेक्षा न्यूयॉर्कमधील मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. एक दिवसात न्यूयॉर्कमधील मृतांची संख्या 237 वरून 728 आणि 965 पर्यंत पोहोचली आहे. एका दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही अमेरिकेतील पहिलीच वेळ आहे. न्यूयॉर्क शहरात सध्या लॉक डाऊन स्थिती असून केवळ शहरातून अॅम्ब्युलन्सचे आवाज ऐकू येत आहेत. अमेरिकेत दोन दिवसांत मृतांचा आकडा दुप्पट झाल्यामुळं अमेरिकेलाच नव्हे तर, संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे. अमेरिकेत सध्या 1 लाख 42 हजार कोरोना रुग्ण आहेत. त्यात नव्याने 275 जणांची भर पडील आहे. आतापर्यंत 2 हजार 489 जणांचा बळी गेला असून, आतापर्यंत 4 हजार 562 जण बरे झाले आहेत. 

आणखी वाचा - जगात मृतांची संख्या वाढली, वाचा सविस्तर बातमी

आणखी वाचा - पाकिस्तानात हिंदूना रेशन धान्य देण्यास नकार 

जगात किती रुग्ण?
कोरोना व्हायरसवर नजर ठेवणाऱ्या वर्डोमीटरनुसार जगभरात 199 देशांमध्ये 7 लाख 24 हजार 592 रुग्ण आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील सर्वाधिक 1 लाख 42 हजार रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. तेथील मृतांची संख्या 2 हजार 489 झाली आहे. सध्याच्या घडीला अमेरिका कोरोनाचं जगातलं केंद्र बनला असला तरी, चीनमध्येही अजून कोरोनाचं थैमान सुरू आहे. चीनने कोरोनावर विजय मिळवल्याचा दावा केला असला तरी, अजूनही चीनमध्ये कोराचे रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील काहींचा मृत्यूही झाला असून, कोरोनाच्या मृता्ंची संख्या 3 हजार 304 झाली आहे. अजूनही चीनमध्ये 81 हजार 470 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हुबेई प्रांतात आहेत. 

loading image