Pfizer vaccine: ब्रिटनमध्ये 90 वर्षीय आजींना दिली कोरोनाची पहिली लस

pfizer vaccination
pfizer vaccination
Updated on

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीला धरलं आहे. कोरोनाच्या विषाणू संसर्गावर अद्याप ठोस उपचार उपलब्ध नाहीये. मात्र, लसनिर्मितीसाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील आहेत.  ब्रिटनने लशीला मान्यता देऊन आज मंगळवारी लसीकरणास सुरवात केली आहे. आज एका 90 वर्षीय महिलेला कोरोनावरील लस देऊन या लसीकरणास सुरवात झाली. ही महिला उत्तर आयर्लंडची रहिवासी आहे. या महिलेचे नाव मारग्रेट कीनान आहे. फायझर/बायो-एन-टेकची लस या महिलेला दिली गेली आहे. त्यामुळे ही जगातील पहिली महिला ठरलीय जीला कोरोनाची लस दिली गेलीय. रिपोर्ट्सनुसार, मध्य ब्रिटनमधील कॉवेंट्रीमधील युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये ही लस देण्यात आली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारग्रेट कीनान यांनी म्हटलंय की, त्यांना सर्वात आधी लस देण्यासाठी निवडलं गेलं आणि याला त्या स्वत:चा गौरव समजत आहेत. त्यांनी म्हटलं की, माझ्या वाढदिवसाच्या आधीच मला मिळालेली ही सर्वोत्कृष्ट भेट आहे. मला आशा आहे की, मी आता आधीसारखेच आयुष्य जगू शकेन सोबतच माझ्या परिवारातील लोकांना भेटू शकेन.

मारग्रेट कीनान यांनी लस घेण्यासाठी इतर लोकांनाही प्रोत्साहित केलं. म्हटलं की, मी जर 90 व्या वर्षी लस घेऊ शकते तर इतर लोक का नाही घेऊ शकत? मात्र, अद्याप ब्रिटनमध्ये लस घेणे अनिवार्य केलं गेलं नाहीये. अलिकडेच ब्रिटनने फायझर कंपनीच्या लशीला आपत्कालीन परिस्थितीत वापराला अस्थायी स्वरुपाची मंजूरी दिली आहे. या अंतर्गत मंगळवारी लसीकरण सुरु झाले आहे. फायझरने अलिकडेच एक रिपोर्ट प्रकाशित करुन दावा केला होता की, त्यांची लस 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे तसेच कोरोनापासून बचावासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कंपनीने दावा केला आहे होता की, या लशीचा वापर अगदी सुरक्षित आहे, यानंतर ब्रिटनने या लशीच्या वापराला मंजूरी दिली होती.

ब्रिटनशिवाय बहरीननेही या फायझर लशीला मान्यता दिली आहे. तिथे देखील लवकरच लसीकरण सुरु होईल. याशिवाय फायझर इंडियाने देखील भारतात आपल्या लशीचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मागितली आहे. मात्र, भारतात फायझर कंपनीच्या लशीबाबत काही आव्हाने देखील असणार आहेत. या लशीला -70 डिग्री तापमानामध्ये सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. शिवाय या लशीच्या वितरणासंदर्भातही आव्हाने असतील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com