esakal | चिंताजनक : युरोपमध्ये सव्वा चार लाख रुग्ण; जाणून घ्या कोठे काय घडले?

बोलून बातमी शोधा

coronavirus worldwide cases death toll crossed 38 thousand

इटली आणि स्पेनमध्ये अद्यापही आशेचा किरण दिसत नसून संसर्गाने अमेरिकेचेही नाक मुठीत धरले आहे. 

चिंताजनक : युरोपमध्ये सव्वा चार लाख रुग्ण; जाणून घ्या कोठे काय घडले?
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Coronavirus : कोरोना विषाणूचा वेगाने वाढणारा संसर्ग आणि बळींची वाढती संख्या यामुळे धास्तावलेल्या युरोप आणि अमेरिकेत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी सुरु झाली आहे. इटली आणि स्पेनमध्ये अद्यापही आशेचा किरण दिसत नसून, संसर्गाने अमेरिकेचेही नाक मुठीत धरले आहे. जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या ३८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील शहरं लॉकडाऊन
कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात येत नसल्याने जगातील अनेक देश लॉकडाउन जाहीर करत आहेत. आत्तापर्यंत जवळपास दोन पंचमांश लोक आपापल्या घरात अडकून पडले आहेत. आज रशियातील मॉस्कोमध्ये आणि अमेरिकेतील व्हर्जिनिया, मेरीलँड आणि कान्सस प्रांतांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आले. राजधानी वॉशिंग्टनमध्ये लोकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालये अपुरी पडतील की काय, या शंकेने अमेरिका सरकारने त्यांच्या लष्कराचे वैद्यकीय जहाजही न्यूयॉर्कमधील बंदरावर आणून ठेवले आहे. यावरून आगामी संकटाचा अंदाज बांधता येतो. संपूर्ण जगात साडे सात लाखांहून बाधित रुग्ण असून एकट्या युरोपमध्ये सव्वा चार लाख आणि एकट्या अमेरिकेत दीड लाखांहून अधिक रुग्ण आहेत. मृतांच्या संख्येतही हेच दोन खंड आघाडीवर आहेत. जर्मनी, ब्रिटन, कॅनडा या देशांच्या प्रमुखांनाच एकांतवासात बसावे लागत असून त्यांच्यासह अनेक देश या संकटातून मार्ग काढण्यासाठी चाचपडत आहेत. 

आणखी वाचा - चीनमध्ये आनंदोत्सव कुत्रा, वटवाघुळाचे मांस खाण्यासाठी गर्दी

अमेरिका-रशिया एकत्र
एकेकाळचे कट्टर वैरी असणारे अमेरिका आणि रशिया हे देश संकटातून मार्ग काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत. या दोन्ही देशांच्या नेत्यांनी दूरध्वनीवरून याबाबत चर्चा करतानाच जागतिक बाजारात तेलाच्या किमती कशाप्रकारे नियंत्रणात राहतील, यासाठी प्रयत्न करायचे ठरविले आहे. रशियामध्ये बाधितांची संख्या फार नसली तरी सावधानता म्हणून मॉस्को शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वाधिक मानवी नुकसान झालेल्या इटली आणि स्पेनमध्ये लॉकडाउनच्या कठोर अंमलबजावणीनंतरही रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून ती कमी होईल, असा विश्‍वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे. येथील रुग्णसंख्या वाढीचा वेग मार्चच्या सुरवातीला असलेल्या ५० टक्क्यांवरून आता ४.१ टक्क्यांवर खाली आला आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हेदेखील आजपासून एकांतवासात गेले आहेत. लॉकडाउनमुळे जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहेच, पण अनेक प्रमुख शहरांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. 

आणखी वाचा - दिल्लीत 20 हजार घरं क्वारंटाइन; वाचा सविस्तर बातमी

आशियाने सावध रहावे 
जकार्ता : उत्तर अमेरिका आणि युरोप हे खंड कोरोना विषाणूचे लक्ष्य ठरले असले तरी आशिया आणि प्रशांत महासागर प्रदेशातील देशांनी गाफिल राहू नये, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ‘ही एक दीर्घकालिन लढाई आहे. आपण गाफिल राहून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येक देशाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करावेत,’असे आवाहन या संघटनेचे विभागीय संचालक डॉ. ताकेशी कासाई यांनी केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून यामध्ये रुग्ण शोधा, त्याला एकांतवासात ठेवा, चाचणी करा, सर्वांपासून दूर राहा, सार्वजनिक कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवा यांचा समावेश आहे. 

आणखी वाचा - दिल्लीत झालेली तबलीगी जमात मर्कज म्हणजे काय?​

जगभरात काय घडले?

 • इटली आणि स्पेनमध्ये अजूनही रोज सरासरी आठशे लोकांचा मृत्यू 
 • इंडियन अमेरिकन कॉंग्रेसच्या नेत्याला कोरानाची लागण 
 • भारतात अडकलेल्या प्रवाशांना परत आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न 
 • आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांकडून औषध फवारणीसाठी ड्रोन विकसित 
 • कोरोनाच्या उपचारासाठी अमेरिकेकडून मलेरियाच्या औषधांचा साठा 
 • अमेरिकेसाठी पुढील तीस दिवस अत्यंत महत्त्वाचे; डोनाल्ड ट्रम्प 
 • चीनमध्ये नवीन 48 रुग्णांना कोरोनाची लागण; मृत्यूची संख्या 3 हजार 305 
 • जोहान्सबर्ग : प्रत्येक घरी जाऊन कोरोनाची चाचणी करण्याचा दक्षिण आफ्रिका सरकारचा निर्णय; बाधितांची संख्या १,३२६ पर्यंत. 
 • न्यूयॉर्क : अमेरिकेतील एकट्या न्यूयॉर्क प्रांतात बळींची संख्या १२०० च्या पुढे. संख्या वाढण्याचा राज्यपालांचा इशारा. सोमवारी एकाच दिवशी २५३ जणांचा मृत्यू. 
 • पॅरिस : सोमवारी रुग्णालयांमध्ये ४१८ जणांचा मृत्यू. घरी अथवा वृद्धाश्रमांमध्ये मृत्यू पावलेल्यांची अद्याप नोंद नाही. 
 • लंडन : लँकेशायर कौंटी क्रिकेट क्लबचे प्रमुख डेव्हीड हॉजकिस यांचा संसर्गामुळे मृत्यू 
 • बीजिंग : चीनमध्ये २४ तासांत एकच मृत्यू. बाधितांची संख्या ४८ ने वाढली. 
 • रोम : इटलीमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय 
  इस्लामाबाद : बाधितांची संख्या १,८६५. लॉकडाउनबाबत नागरिक अद्यापही गंभीर नाही.