ट्रम्प कोरोना संसर्गाच्या धोक्यातून बाहेर; व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 October 2020

अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोना संसर्गाच्या धोक्यातून बाहेर आले आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोना संसर्गाच्या धोक्यातून बाहेर आले आहेत. गेल्या 10 दिवसात ट्रम्प यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 1 ऑक्टोंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना 2 ऑक्टोंबर रोजी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस तेथे राहिल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या 10 दिवसांपासून ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये विलगीकरणात आहेत.

कोणतीही बँक गावातील व्यक्तीला कर्ज नाकारणार नाही; मोदींची ग्वाही

ट्रम्प यांचे डॉक्टर सिन कॉनली यांनी निवेदन जारी करत माहिती दिली. मला सांगायला आनंद वाटतो की, डोनाल्ड ट्रम्प आता कोरोनाच्या धोक्यातून बाहेर आले आहेत. त्यांच्यामार्फत आता इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही, असं ते म्हणाले आहेत. ट्रम्प यांची टेस्ट करण्यात आली होती, यात त्यांच्यातील विषाणूचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. तसेच नवीन विषाणू निर्माण होणेही बंद झाले आहे, असं कॉनली यांनी सांगितलं. पण, ट्रम्प कोरोनामुक्त झालेत असं ते म्हणाले नाहीत. 

डोनाल्ड ट्रम्प यांना ताप नाही. तसेच त्यांच्यात कोरोनाची लक्षणेही दिसून येत नाहीयेत. त्यामुळे ते राष्ट्रपती म्हणून आपला कार्यभार सांभाळण्यासाठी लवकरच सक्रिय होतील, अशी माहिती कॉनली यांनी दिली. आरोग्य खात्याच्या मार्गदर्शन तत्वानुसार कोरोनाची लक्षणे दिसून येत नसल्यास 10 दिवसांनतर विलगीकरणाचा कालावधी संपतो. काही गंभीर प्रकरणामध्ये हा कालावधी 20 दिवसांचा असतो.  

Forbesची यादी जाहीर: जाणून घ्या भारतातीत सर्वात श्रीमंत महिलांबद्दल

वरिष्ठ सरकारी वैज्ञानिक अँटनी फौजी Anthony Fauci यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपती ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांना लोकांमध्ये मिसळू दिलं जाणार नाही. 

दरम्यान, अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आमनेसामने आहेत. ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रचारात अडथळा निर्माण झाला आहे. 15 ऑक्टोंबर रोजी होणारी दुसरी प्रेसिडेंटशिअल डिबेट रद्द होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ट्रम्प लवकरात लवकर प्रचार सुरु करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald Trump No Longer at Transmission Risk Says White House Doctor