
इटलीच्या दक्षिणेकडील नेपल्समध्ये भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर मृत देवमाशाचे महाकाय धूड सागरी सुरक्षा दलाच्या जवानांना आढळले. हे धूड ७० टन असावे असा अंदाज आहे. हा जगातील सर्वांत मोठा देवमासा असावा असे मानले जात आहे.
भूमध्य सागरामधील देवमासा आतापर्यंतचा सर्वांत मोठा?
रोम - इटलीच्या दक्षिणेकडील नेपल्समध्ये भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर मृत देवमाशाचे महाकाय धूड सागरी सुरक्षा दलाच्या जवानांना आढळले. हे धूड ७० टन असावे असा अंदाज आहे. हा जगातील सर्वांत मोठा देवमासा असावा असे मानले जात आहे.
या दलाच्या जवानांनी बोटीमधून हे धूड किनाऱ्यावर आणले. सोरेंतो या लोकप्रिय पर्यटन स्थळापाशी सागरी सुरक्षा दलाच्या पाणबुड्यांना समुद्रात हा देवमासा रविवारी मृतावस्थेत आढळला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मंगळवारी रात्री जवानांनी हे धूड वाहून आणण्याचे प्राथमिक काम पूर्ण केले. त्यानंतर सोरेंतो येथून नेपल्स बंदरावर ते आणण्यात आले. त्यासाठी दोन बोटींचा वापर करण्यात आला. आता सागरी जीवशास्त्रज्ञ आणि इतर तज्ञ त्याच्या मृत्यूच्या कारणांबाबत चाचण्या करीत आहेत. त्यासाठी शवविच्छेदन केले जाईल. नंतर देवमाशाचा सांगाडा एका संग्रहालयात ठेवण्याची अधिकाऱ्यांची योजना आहे.
100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूमधून वाचली; आता आजीने कोरोनाची घेतली लस
छोट्या देवमाशामुळे...
तुलनेने छोट्या आकाराच्या देवमाशाने सागरी सुरक्षा दलाच्या पाणबुड्यांचे लक्ष वेधले आणि त्यांना या धुडापर्यंत नेले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा देवमासा दुःखात होता. नंतर तो समुद्रात गायब झाला. आता पाणबुडे तो त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा देवमासा पुन्हा कुठे दिसतो का यासाठी एक पथक सक्रिय आहे.
'ठोको ताली'; बायडेन यांच्या भाषणामागे भारतीयाचा हात!
Edited By - Prashant Patil