
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातला त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हनोई विमानतळावर विमानातून उतरण्याआधीचा हा व्हिडीओ आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन विमानाच्या दरवाज्यात उभा होते. त्यावेळी आतून एक महिला त्यांचं तोंड एका हाताने दाबत असल्याचं आणि चापट मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीनेच असं केल्याचं आता समोर आलंय. हा व्हिडीओ खरा असल्याचं फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानेही स्पष्ट केलंय.