Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी

देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे
donald-trump
donald-trump

देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. यासोबतच लैंगिक छळ आणि बदनामी केल्याबद्दल त्याला 5 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.(ex us president donald trump convicted in sexually abused writer e jean carroll case fined rs 410 crore)

नेमकं काय आहे प्रकरण?

एका मासिकाच्या लेखक ई. जीन कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये 1996 मध्ये ट्रम्प यांनी कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला होता.

कॅरोल यांनी 2019 मध्ये एका पुस्तकात या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता. हा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं आहे की, 1990 च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक शोषणप्रकरणी ट्रम्प दोषी आहेत.

ट्रम्प यांनी अनेकदा कॅरोल यांनाला खोटं बोलून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आणि कॅरोलला 5 लाख डॉलर्सची नुकसान भरपाई दिली.

donald-trump
Imran Khan Arrested : पाकिस्तानमध्ये ट्विटर, फेसबुक, यूट्युब सेवा बंद; परिस्थिती चिघळली

दरम्यान, न्यायालयानं ट्रम्प यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचा आरोप न्यायालयानं फेटाळला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कॅरोलवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलेलं नाही.

ज्युरीनं कॅरोलचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता.

ज्युरीनं कॅरोल यांचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता.

donald-trump
Imran Khan Arrested: पाकिस्तानात अनागोंदी! भारतीय सुरक्षा दलं अॅलर्ट; LOCवर वाढवली गस्त

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सार्वजनिकरित्या अपमानास्पद आणि बदनामीचं कारण म्हटलं आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिलपासून सुरू झाली होती आणि आता नऊ सदस्यांच्या ज्युरीनं ट्रम्प यांना लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com